श्री वटवृक्ष स्वामींचे मंदिर नांदगावकर परिवाराचे मुख्य श्रद्धास्थान – बाळा नांदगावकर
- मा.आ.बाळा नांदगांवकर व कुटूंबियांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

श्री वटवृक्ष स्वामींचे मंदिर नांदगावकर परिवाराचे मुख्य श्रद्धास्थान – बाळा नांदगावकर

नांदगावकर परिवार स्वामी समर्थांच्या श्रध्दास्थानी आहे. कारण स्वामी समर्थांनी स्वतःच म्हटले आहे. जे भक्त माझी अनन्य भावे स्मरण करतील त्यांच्या सदैव पाठीशी राहून रक्षण करीन. आज पर्यंत अनेक अडचणींवर मात करून मार्ग काढण्याची बुद्धी स्वामीनी दिलेली आहे. त्याचे कौशल्य आम्हाला स्वामी भक्तीतून प्राप्त झालेले आहे. या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र अक्कलकोट मधील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचे मुख्य श्रद्धास्थान असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील मनसे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटूंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी बाळा नांदगावकर व कुटुंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी नांदगावकर बोलत होते. पुढे बोलताना नांदगावकर यांनी श्री स्वामी समर्थांच्या श्रद्धेय भक्ती प्रित्यर्थ स्वामी समर्थांचे आशीर्वाद नेहमीच माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या पाठीशी असतात, त्यामुळे या आशीर्वादांच्या प्रेरणेतून जीवन जगण्यास उर्जा मिळते असे सांगून स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता पुन्हा पुन्हा स्वामींनी आपल्याला अक्कलकोटला बोलवावे याकरिता स्वामी चरणी साकडे घातले असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी
त्यांच्या समवेत सोलापूर जिल्ह्याचे मनसे नेते दिलीप धोत्रे, विनायक महिंद्रकर, गणेश चुक्कल, अमर कुलकर्णी, प्रशांत इंगळे, प्रशांत नवगिरे, चंद्रकांत गुरव, शशिकांत कदम, शैलेश रहाटे, विष्णू भंडारी व अक्कलकोट मनसे नेते किरण किरात, प्रकाश सुतार, शशी कोळी, देवेंद्र शिंदे, पवन देसाई, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, संजय पवार, प्रसाद सोनार, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, व्यंकटेश पुजारी आदींसह स्वामी भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – मा.आ.बाळा नांदगांवकर व कुटूंबियांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
