गावगाथा

राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान तर्फे कुरनूर येथे जन्म सोहळा उत्साहात साजरा

जयंती विशेष

राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान तर्फे कुरनूर येथे जन्म सोहळा उत्साहात साजरा

कुरनूर : राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने कुरनूर येथे राजमाता जिजाऊ जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पाच दिवसीय कार्यक्रमात प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

पुरस्कार प्रदान सोहळा:
कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी, प्रतिष्ठानतर्फे चार विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

उत्कृष्ट ग्रामीण पत्रकारितेचा पुरस्कार: धोंडप्पा नंदे

युवा उद्योजक पुरस्कार: रवी लक्ष्मण कोळी

युवा प्रगतिशील शेतकरी पुरस्कार: नादर अब्दुल जमादार

उत्कृष्ट युट्युब पुरस्कार: किसन मोरे

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
पहिल्या दिवशी आबा महाराज कुरनूरकर यांच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापना आणि पूजा करण्यात आली. दुसऱ्या दिवशी नागनाथ प्रशालेचे शिक्षक सुरेश माने यांचा सेवापूर्ती निमित्त कृतज्ञता सत्कार करण्यात आला. तिसऱ्या दिवशी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर आधारित पोवाडा सादर करण्यात आला. शेवटच्या दिवशी गावातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला सरपंच व्यंकट मोहन मोरे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण शिंगटे, एसएस ग्रँड पावरचे मालक केदार मोरे, समाधान मोरे, दिगंबर जगताप यांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील विद्यार्थिनींनी जिजाऊंच्या वेशभूषा साकारून कार्यक्रमाचे आकर्षण वाढवले.

मान्यवरांची भाषणे आणि शुभेच्छा:
युवा उद्योजक रवी कोळी यांनी त्यांच्या यशस्वी उद्योग उभारणीचा प्रवास उलगडून प्रतिष्ठानच्या सहकार्याबद्दल आभार मानले. धोंडप्पा नंदे यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. सरपंच व्यंकट मोरे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव करत अडचणी सोडवण्यासाठी पूर्ण पाठिंबा देण्याची ग्वाही दिली.

भविष्यासाठी विशेष योजना:
कार्यक्रमात शैक्षणिक, आरोग्य आणि उद्योगविषयक समस्या सोडवण्यासाठी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन नारायण निंबाळकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button