गावगाथा

स्वामी भक्तीतून जीवनाने आध्यात्माची कास धरली – आय.ओ.सी.चेअरमन वैद्य

आय.ओ.सी.चेअरमन वैद्य व कुटूंबियांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, काशिनाथ गोळ्ळे, प्रविण कुलकर्णी व अन्य दिसत आहेत.

स्वामी भक्तीतून जीवनाने आध्यात्माची कास धरली – आय.ओ.सी.चेअरमन वैद्य

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१८/८/२४)
जीवनातील स्वामींच्या प्रचितीनुसार
स्वामी समर्थांची अगाध लिला पाहून मीही धन्य झालो. कळत नकळत जीवन स्वामी भक्तीत गुंतत गेले. या स्वामी भक्तीतून जीवनाने अध्यात्माची कास धरली या प्रेरणेतूनच दत्त सांप्रदायच्या सर्व तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन नतमस्तक होत आज या संप्रदायातील शेवटच्या अवतार असलेल्या स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होण्याकरिता त्यांच्या मूळस्थानी म्हणजेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट दिले. यावेळी कुटुंबासमवेत समर्थांचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणी नतमस्तक झालो असल्याचे मनोगत ऑल इंडिया इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे (I.O.C.) चेअरमन श्रीकांतजी वैद्य यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी
श्रीकांतजी वैद्य यांचा व कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला. याप्रसंगी वैद्य बोलत होते. यावेळी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मुंबईचे ई.डी.पांडे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अभियंता प्रमुख प्रसाद घुले, सेल्स ऑफीसर प्रियांका केरवाल, इंडियन ऑइल अक्कलकोटचे डीलर काशिनाथ गोळ्ळे, कुंभारीचे डीलर प्रवीण कुलकर्णी, इटकळचे डीलर पाटील, मनोज इंगुले, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, संतोष जमगे इत्यादी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – आय.ओ.सी.चेअरमन वैद्य व कुटूंबियांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, काशिनाथ गोळ्ळे, प्रविण कुलकर्णी व अन्य दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button