गावगाथा

वडीलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शाळेस कमान भेट देऊन नवीन पाडला पायंडा…..

जिल्हा परिषद शाळेस कै. प्रल्हाद अंबाजी गायकवाड यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शाळेस भव्य कमान गायकवाड परिवाराकडून

वडीलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शाळेस कमान भेट देऊन नवीन पाडला पायंडा…..

मुरुम, ता. उमरगा, ता. १८ (प्रतिनिधी) : केसरजवळगा, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेसाठी आपले वडील दिवंगत प्रल्हाद अंबाजी गायकवाड यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शाळेस सुंदर अशी भव्य कमान भेट देऊन नवीन पायंडा घालणारे नवतरुण उद्योजक विशाल गायकवाड व त्यांच्या सहचारिणी शितल गायकवाड यांच्यातर्फे शाळेस मोठी भेट दिल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. या शाळेची स्थापना सन १८८५ ची असून गेल्या चार वर्षापासून शिक्षक, गावकरी, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेला विविध प्रकारच्या सेवासुविधा पुरविल्या जात आहेत. आजपर्यंत सहा लाखापेक्षा अधिक किंमतीच्या वस्तू शाळेस प्राप्त झाल्या आहेत. या अगोदर मल्लीनाथ तोरणगे यांनी शाळेस गेट भेट दिल्याने शाळेस कमानीची अत्यंत गरज होती. ती गरज ओळखून विशाल गायकवाड परिवाराने ३५ हजार रूपये खर्च करून भव्य कमान शाळेस भेट दिली. देशाचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना शाळेस अनोखी भेट देऊन आपल्या वडीलांच्या स्मृती नेहमीसाठी तेवत राहाव्यात अशा हेतूने त्यांनी ही भेट दिल्याचे सांगितले. यावेळी ताराबाई प्रल्हाद गायकवाड व गायकवाड कुटुंबीयांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच पूजा पटवारी, उपसरपंच अजहर इनामदार, ग्रामविकास अधिकारी गोरख हलबुर्गे, अध्यक्ष नाजीम शेख, वैजनाथ कंटेकूरे आदींची उपस्थिती होती. माजी सैनिक जयपाल राजपूत, उपक्रमशील शिक्षक बालाजी भोसले, माजी सरपंच अमोल पटवारी, मुख्याध्यापक नबीलाल शेख आदींनी पुढाकार घेतला. याप्रसंगी सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

फोटो ओळ : केसरजवळगा, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेस कै. प्रल्हाद अंबाजी गायकवाड यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शाळेस भव्य कमान गायकवाड परिवाराकडून

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button