Akkalkot: पुण्यातील वेस्ट झोन संस्थेकडून वटवृक्ष मंदिरात स्वामींचरणी डीसी जनरेटर अर्पण

अक्कलकोट (प्रतिनिधी): येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास पुण्यातील स्वामीभक्त नंदा कोंढाळकर कुटुंबीयांच्या वेस्ट झोन संस्थेकडून ३००० वॅटचे डीसी जनरेटर भेट देऊन स्वामी चरणी अर्पण करण्यात आले. याप्रसंगी अर्पण झालेल्या या डीसी जनरेटरचा चेअरमन महेश इंगळे, विश्वस्त पदाधिकारी व कोंढाळकर कुटुंबीयांच्या उपस्थितीत प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी नंदा कोंढाळकर व कुटुंबीयांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन यथोचित सन्मान केला व आज रात्री मंदिरात संपन्न होणाऱ्या स्वामींच्या पालखी सोहळ्यास उपस्थित राहून पालखी सोहळा व स्वामी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती केली.

याप्रसंगी बोलताना नंदा कोंढाळकर यांनी समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या माध्यमातून आम्हाला अत्यंत शांतचित्ताने स्वामी दर्शनाचा लाभ मिळालेला आहे. आम्ही कोंढाळकर कुटुंबीय स्वामीभक्त आहोत स्वामीभक्तीच्या या माध्यमातून स्वामींची काहीतरी सेवा करावी या उद्देशाने आमच्या वेस्ट झोन संस्थेमार्फत श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास स्वामी चरणी ३००० वॅटचे डीसी जनरेटर अर्पण केले असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कोंढाळकर कुटुंबियांकडून स्वामी चरणी अर्पण करण्यात आलेल्या ३००० वॅटच्या या डीसी जनरेटरचा वापर दरवर्षी स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी पालखी सोहळा मिरवणुकीत, दत्त जयंती निमित्त व गुरुप्रतिपदेनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या पालखी सोहळा मिरवणुकीत या जनरेटरचा वापर होऊन स्वामी सेवेत कामी येईल असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, प्रथमेश इंगळे, स्वामीनाथ लोणारी, श्रीशैल गवंडी, रवीराव महिंद्रकर, काशिनाथ इंडे, श्रीकांत मलवे, ऋषिकेश कोंढाळकर, अनिकेत कोंढाळकर, धनश्री कोंढाळकर, स्नेहा कोंढाळकर कुटुंबीय उपस्थित होते.

