शेतमजुराच्या मुलीला मिळाली 8 हजारांची शिष्यवृत्तीस समाजसेवक जयनारायण भुतडा यांचे दातृत्व
वीरशैव व्हिजनच्या प्रयत्नाला यश

शेतमजुराच्या मुलीला मिळाली 8 हजारांची शिष्यवृत्तीस माजसेवक जयनारायण भुतडा यांचे दातृत्व

वीरशैव व्हिजनच्या प्रयत्नाला यश

सोलापूर : वीरशैव व्हिजनच्या प्रयत्नातून आणि समाजसेवक जयनारायण भुतडा यांच्या दातृत्वातून पॉलिटेक्निक महाविद्यालयात संगणक शास्त्र पदविकेचे शिक्षण घेणाऱ्या शेतमजुराच्या मुलीला 8 हजाराची शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळाली.
काव्यश्री फुलारी असे तिचे नाव असून ती अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील रहिवासी आहे. तिचे वडील विजयकुमार फुलारी शेतमजूर आहेत. त्यांना 3 मुली व 1 मुलगा आहे. घरखर्च आणि 4 मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च भागवताना त्यांना प्रचंड आर्थिक अडचणी येत आहेत. त्यात ते नुकतेच आजारपणातून बरे झाले. त्याचाही मोठा खर्च झाला. काव्यश्री ही श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज येथे प्रथम वर्षात शिकत आहे. तिच्या महाविद्यालयाच्या फी मधील 8 हजार रुपये भरावयाचे राहिले होते. शैक्षणिक वर्ष संपत येऊन परीक्षा सुरु आहेत. मात्र तिला फी भरणे शक्य होत नव्हते.
ही माहिती वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांना समजल्यानंतर त्यांनी जयनारायण भुतडा यांच्याशी संपर्क साधला. काव्यश्रीची अडचण त्यांना सांगितली. त्यांनी लागलीच त्या विद्यार्थिनीस घरी घेऊन येण्यास सांगितले आणि मिठाई भरवत 8 हजारांचा चेक तिच्या हाती सुपूर्द केला.
याप्रसंगी उद्योगपती विनोद भुतडा, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे, विश्वस्त सोमेश्वर याबाजी, मन्मथ डोंगे, सचिन विभुते व योगेश दुधाळे उपस्थित होते.

फोटो ओळी : वीरशैव व्हिजनच्या प्रयत्नातून काव्यश्री फुलारी हिला 8 हजार रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती देताना जयनारायण भुतडा, विनोद भुतडा, राजशेखर बुरकुले, चिदानंद मुस्तारे, सोमेश्वर याबाजी, मन्मथ डोंगे, सचिन विभुते
