मुख्यमंत्री सहाय्यता प्रमुख मंगेश चिवटे यांचा सत्कार
सामाजिक कार्यकर्ते सोमेश्वर वाडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.यावेळी सिध्दू गोगी व गावगाथा चे संपादक धोंडप्पा नंदे उपस्थित होते

मुख्यमंत्री सहाय्यता प्रमुख मंगेश चिवटे यांचा सत्कार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा सत्कार सोमेश्वर वाडी यांच्या हस्ते करण्यात आला.
आरोग्य दूत म्हणून अख्खा महाराष्ट्राला परिचित असलेले मंगेश चिवटे यांनी आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची निर्मिती केली होती. या माध्यमातून महाराष्ट्रातल्या अनेक रुग्णांना फायदा झाला होता. त्याच धर्तीवर २०१९ मध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची निर्मिती करून या संघटनेचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण करून आरोग्य सेवा सुदृढ करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेली पाच वर्षापासून ते कार्यरत असून खा श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांचे प्रश्न सोडवण्याचे काम करत आहेत.
महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी आपत्कालीन संकट आली त्या त्या ठिकाणी मदत करण्याच्या कामात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.अशा आदर्श व्यक्तिमत्वाला महाराष्ट्रातून विविध सामाजिक संघटनेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येते आहे.
पुणे येथे पुरस्कार कार्यक्रमात बसव अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते सोमेश्वर वाडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.यावेळी सिध्दू गोगी व गावगाथा चे संपादक धोंडप्पा नंदे उपस्थित होते
