अक्कलकोट व दुधनी बाजार समितीसह स्वामी समर्थ सह.साखर कारखान्यावर वर्चस्व माझ्या शेतकरी बांधवांना श्रेय असून, श्री बसवेश्वर मार्केट यार्डाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्द सिद्रामप्पा पाटील

अक्कलकोट दि.29 : माझ्या व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट व दुधनी बाजार समितीसह स्वामी समर्थ सह.साखर कारखान्यावर वर्चस्व सिध्द करण्यासाठी झटलेल्या माझ्या शेतकरी बांधवांना श्रेय असून, श्री बसवेश्वर मार्केट यार्डाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्द आहे. बाजार समितीच्या हितार्थ कार्य करताना शेतकरी, व्यापारी यांची सांगड घालून कायापालट विकासकामे हाती घेतले जातील असे मनोगत अक्कलकोट बाजार समितीचे नूतन सभापती माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी व्यक्त केले.
ते सोमवारी अक्कलकोट अडत व्यापारी असोसिएशनच्यावतीने समितीच्या सभापती व उपसभापती व संपूर्ण संचालक मंडळाचा सत्कार बाजार समितीच्या शेतकरी भवनात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सिद्रामप्पा पाटील हे बोलत होते.
यावेळी उपसभापती अप्पासाहेब पाटील, संजीवकुमार पाटील, प्रकाश कुंभार, मल्लिकार्जुन पाटील, कार्तिक पाटील, बसवराज माशाळे, बाबुशा करपे, श्रीशैल घिवारे, यलप्पा ग्वल, शिवमंगल बिराजदार, पार्वतीबाई स्वामी यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान सभापती सिद्रामप्पा पाटील यांचा सत्कार ज्येष्ठ व्यापारी प्रकाश किलजे तर उपसभापती अप्पासाहेब पाटील यांचा सत्कार ज्येष्ठ व्यापारी सिध्देश्वर भंडारे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक मल्लिकार्जुन पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यापारी काशिनाथ हिळ्ळी, संगमेश्वर हिप्परगी, गुरु उण्णद, अशोक तेलुणगी, समर्थ धनशेट्टी, अप्पू बिराजदार, रमेश कणबसे, अशोक कोकरे, चन्नप्पा हळगोदे, शिवशरणप्पा सरसंबे, महेश तडकल, गुंडप्पा उण्णद, स्वामीनाथ गंभीरे, महादेव उण्णद, गुरुशांत कुंभार, ओम कत्ते, सुभाष बगले, राजु कोळी, गौरीशंकर बहिरगोंडे, शब्बीर व मुसा बागवान, रोहित खोबरे, राहुल तेलुणगी यांच्यासह बहुसंख्य आडत व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजयकुमार बिराजदार, आभार सोमनाथ हळगोदे यांनी मानले.
सत्कारातनंतर मार्केट यार्डात सौदा लिलावास सभापती सिद्रामप्पा पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. तूर 9800, हरभरा 5050, सोयाबीन 5100 भाव मिळाला.