*नागणसुर येथे 3 सप्टेंबर रविवारी गडीनाड कन्नड संस्कृती संभ्रम कार्यक्रम*
*विविध क्षेत्रातील व्यक्तीं व संस्थाना गडीनाड रत्न पुरस्कार प्राप्त :*

*नागणसुर येथे 3 सप्टेंबर रविवारी गडीनाड कन्नड संस्कृती संभ्रम कार्यक्रम*

*अक्कलकोट :* दि.30 (प्रतिनिधी): *नागणसुर येथील बम्मलिंगेश्वर मठात रविवार, दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी ‘भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा’चा आठवणीसाठी आदर्श कन्नड बळग महाराष्ट्र, कर्नाटक गडी प्रदेश अभिवृद्धी प्रधिकार बेंगळुरू आणि श्री.गुरू बम्मलिंगेश्वर कल्याण केंद्र नागणसुर-रेवूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडीनाड कन्नड संस्कृती उत्सव व कन्नड -मराठी भाषा बंधुत्व कार्यक्रमाचे आयोजन केेले असून गडीनाड भागातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.*

या पत्रकार परिषदेस नागणसुर मठाचे परमपूज्य श्री श्रीकांठ शिवाचार्य महास्वामिजी, आदर्श कन्नड बळग महाराष्ट्रचे अध्यक्ष मलिकजान शेख, उपाध्यक्ष राजशेखर उंबराणीकर, सहसचिव बसवराज धनशेट्टी, शरणप्पा फुलारी, चिदानंद मठपती, विद्याधर गुरव, प्रशांत बिराजदार आदीजण उपस्थित होते.

रविवारी दि.3 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. विविध कला संघ आणि सर्व शाळेतील विद्यार्थी नागणसुर येथील प्रमुख मार्गावरून भुवनेश्वरी देवी प्रतिमा मिरवणूक निघणार आहे. 10 वा. डॉ.जयदेवीताई लिगाडे व्यासपीठाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्त होणार आहे. गडीनाड भागातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच ‘आदर्श शाळा’ व ’गडीनाडरत्न’ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

दुपारी 1 वा.विचार गोष्टी, दुपारी 3 वा. कविगोष्टी, दुपारी 4.15 वाजता कार्यक्रमाचे समारोप होणार आहे. तसेच संध्याकाळी 6 वाजता भरत नाट्य, जानपद नृत्य, संगीत कार्यक्रम आणि विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे.

कार्यक्रमास खासदार डॉ.जयसिद्धेश्र्वर महास्वामी व श्री. श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्ष स्थानी कर्नाटकचे कन्नड संस्कृती मंत्री शिवराज तंगडगी हे राहणार आहे. कार्यक्रमाच्या सर्वाध्यक्ष स्थानी एन.आर कुलकर्णी असणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून आळंदचे आमदार बी.आर.पाटील, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, कन्नड साहित्य परिषद महाराष्ट्र घटकचे अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी, डॉ.आर.के.पाटील, मल्लिकार्जुन पाटील, आनंद तानवडे, महेश हिंडोळे यांच्या विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे.
*गडीनाड रत्न पुरस्कार प्राप्त :* राजकुमार अमोगी जेऊर, नीलप्पा कवटगी वळसंग,शिवानंद पाटील इब्राहिमपुर,बसवराज शेळके वागदरी,गुरुनाथ नरूणे अक्कलकोट,राजश्री सोलापूरे, सलगर,वंदना कळसगोंडा नागणसुर,मल्लिनाथ पाटील अक्कलकोट, जयदेवी उकली मैंदर्गी,अशोक चव्हाण गुरववाडी, महांतेश कौलगी सोलापूर,राजश्री चिंचोळी मैंदर्गी,कुसुमावती गच्चीनमठ रोडगी.
*आदर्श शाळा पुरस्कार :* जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा तोळणुर, जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा शिरवळवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा गोपाळ तांडा जेऊर,जगद्गुरु पांचाचार्य प्रशाला गौडगांव.
*वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी निवड झालेली विद्यार्थी सत्कार :* वर्षाराणी वैजनाथ प्रचंडे नागणसुर, इरेश खेड नागणसुर, शिवराज कुंबार गौडगांव, श्रीशैल बसवराज उणणद तोळणुर, ऐश्वर्या माड्याळ नागणसुर, पृथ्वी कालगेरी नागणसुर, डॉ.अशोक पाटील, डॉ.शृति घुगे.