गावगाथा

कला-क्रीडा व सांस्कृतिक गुणांची जोपासना करताना विद्यार्थी दशेतच आपल्या आवडत्या क्षेत्रात ध्येय निश्चित करा. : कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा

अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी.बी. खेडगी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ

 

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट, दि. ८-
कला-क्रीडा व सांस्कृतिक गुणांची जोपासना करताना विद्यार्थी दशेतच आपल्या आवडत्या क्षेत्रात ध्येय निश्चित करा. हे ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्न करत राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित
सी.बी. खेडगी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभास मुख्य अतिथी म्हणून डॉ. दामा बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा श्रीमती शोभाताई खेडगी हे होत्या. व्यासपीठावर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदचे सदस्य देवानंद चिलवंत, संस्थेचे सचिव सुभाष धरणे, संचालक श्रीशैल भरमशेट्टी, संचालिका पवित्रा खेडगी, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य
डॉ. किसन झिपरे
प्राचार्य डॉ. शिवराय अडवितोट, उप-प्राचार्य बसवराज चडचण
प्र. पर्यवेक्षक
प्रा. संजय कलशेट्टी, समन्वयक डॉ. गुरुलिंगप्पा धबाले
उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

प्र. कुलगुरू डॉ. दामा पुढे म्हणाले की, स्पर्धेच्या युगात सगळ्यांनाच शासकीय सेवेची संधी मिळणार नाही, त्यामुळे करिअरच्या वेगवेगळ्या वाटांची माहिती आपणास आवश्यक आहे. विविध क्षेत्रातील संधींचा अभ्यास करून आपले क्षेत्र निवडा. शक्यतो आपल्या उद्योजकीय गुणांची जोपासना करून स्वयंरोजगाराची कास धरा व आदर्श नागरिक म्हणून देशाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका वठवा.

HTML img Tag Simply Easy Learning    

अध्यक्षीय भाषणात शोभा खेडगी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व कला, क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसह गुणीजन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे गौरव करण्यात आला.
प्रारंभी प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्वागत प्रा. प्रकाश सुरवसे यांनी तर
प्रास्ताविक भाषण प्रा. विठ्ठल वाघमारे यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. जयश्री बिराजदार यांनी करून दिला. महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल वाचन प्राचार्य डॉ. शिवराय आडवीतोट यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. दयानंद कोरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button