महादेव कोगनुरे यांना “राज्यस्तरीय समाजभूषण तथा युवारत्न पुरस्कार” प्रदान..
महादेव कोगनुरे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील सर्वच स्तरातून खूप कौतुक होत आहे.

महादेव कोगनुरे यांना “राज्यस्तरीय समाजभूषण तथा युवारत्न पुरस्कार” प्रदान..

अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ सोलापूर व लायन्स क्लब ऑफ़, सोलापूर मेट्रो च्या वतीने एम के फाउंडेशनचे संस्थापक श्री महादेव कोगनुरे साहेब यांना निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत ‘राज्यस्तरीय समाजभूषण तथा युवारत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी सामाजिक, राजकिय कला क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना संस्थेच्या पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला, महादेव कोगनुरे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील सर्वच स्तरातून खूप कौतुक होत आहे.

चौकट

“पुरस्कार मला मिळाला असला तरी माझ्यासोबत काम करणारे असंख्य हात आहेत. माझे सर्व सहकारी मित्र, माझ्या फाऊंडेशनचे पदाधिकारी, कर्मचारी, सामजिक कार्यकर्ते या सर्वांचा यामध्ये महत्वाचा वाटा आहे. शिवाय या पुरस्कारामुळे अधिक जबाबदारी वाढली याचीही मला पूर्ण जाणीव आहे” – महादेव कोगनुरे

याप्रसंगी श्री.ला.ईश्वर झुंजा,अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो, श्री अभिजित भांजे, अध्यक्ष अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ, सोलापूर, श्री अशोक भांजे, कुलपती, अपूर्वा अभिमत ज्ञानपीठ, सोलापूर ह्यांच्यासह विविध क्षेत्राील मान्यवर उपस्थित होते.