गावगाथाठळक बातम्या
Pune : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरचा IAS पद UPSC ने घेतला काढून

पुणे (प्रतिनिधी): वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाने अखेर दोषी ठरविले असून त्यांची उमेदवारी रद्द केली आणि त्यांना भविष्यातील सर्व परीक्षा/निवडींमधून कायमचे काढून टाकण्यात आलं आहे.

पूजा खेडकर यांना 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यांचे उत्तर न मिळाल्याने यूपीएससीने ही कारवाई केली आहे.

तसेच, पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीने कारवाई केल्यानंतर आता पोलिस त्यांच्यावर कारवाई करण्याची दाट शक्यता असून त्यांनी यूपीएससीमध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यूपीएससीने आता पूजा खेडकर यांचे पद काढून घेतलं असून त्यांना भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यात येणार नाही.
