Maval : कासरसाई धरणात बुडून पुण्यातील दोन तरूणांचा मृत्यू
मावळ (प्रतिनिधी) दि.२९, मित्रांसोबत फिरायला आलेले दोन तरुण कासारसाई धरणात बुडाले. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही घटना बुधवारी (दि. 29) दुपारी घडली.

मुरलीकृष्ण (वय 21, रा. कोरेगाव पार्क, पुणे), कुणाल दुबे (वय 21, रा. केशवनगर, पुणे) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कासारसाई धरणात विहारासाठी आलेले दोन तरुण धरणाच्या पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. शिरगाव पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि पीएमआरडीएच्या पथकांना पाचारण केले. दोन्ही पथके धरणात दाखल झाली. एका तरुणाला पीएमआरडीएच्या पथकाने तर दुसऱ्या तरुणाला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन समितीने बाहेर काढले.

निलेश गराडे, अनिल आंद्रे, अनिश गराडे, अविनाश कारले, निनाद काकडे, शुभम काकडे, विनय सावंत, गणेश ढोरे, कुंदन भोसले, अजय मुऱ्हे, भास्कर माळी यांनी शोधकार्यात सहभाग घेतला.
