Akkalkot : हन्नूर येथील अनंत चैतन्य प्रशालेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अक्कलकोट (प्रतिनिधी): महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था, अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, हन्नूर येथे मार्च २०२४ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या कु. सानिका मंगरुळे (८८℅प्रथम) ,कु.मुनजा पिरजादे(८७.२०℅द्वित्तीय) कु.शिरीन पिरजादे(८७℅तृत्तीय)अशा तीन ही विध्यार्थीनींचा सत्कार हन्नूर गावचे उपसरपंच व युवा नेते सागर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून करण्यात आला.

कु. सानिका मंगरुळे ही ८८℅ गुण प्राप्त करून चप्पळगाव केंद्रातून पहिली आल्याबद्दल सागरदादा यांनी तिचे विशेष कौतुक करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.व सर्व यशस्वी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.आणि विशेष बाब म्हणजे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी शाळेचा निकाल 100% लागला.

यावेळी मुख्याध्यापक विलास बिराजदार, पर्यवेक्षक अशोक साखरे,शिक्षक ज्ञानदेव शिंदे, धनंजय जोजन, शशिकांत अंकलगे, सौ. मृदुलादेवी स्वामी, राजेंद्र यंदे, पालक इरण्णा मंगरुळे, खमरअली पिरजादे उपस्थित होते.
