दौंड तालुक्यातील केडगाव -बोरीपार्धी व परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे विद्युत वितरण चा पहिल्याच पावसात बोजवारा*
*दौंड तालुक्यात या अवकाळी पावसाने थैमान घातलेल आहे. त्यामध्ये विद्युत महावितरण कंपनीकडून करण्यात येणारा विद्युत पुरवठा चार दिवसापासून केडगाव -बोरीच्या बहुतांश भागामध्ये नसल्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेल आहे. सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जायला लागत आहे. शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध नागरीक, जनावरे यांचीही विद्युत पुरवठा होत नसल्यामुळे पाण्या वाचून मोठ्या प्रमाणात हाल होत आहे .त्यासंदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे दौंड तालुका उपाध्यक्ष ,श्री. प्रदेश शेलार,श्री संदीप चव्हाण व श्री. अनिल नेवसे (सामाजिक कार्यकर्ते)यांच्यावतीने विद्युत महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मा. श्री. विकास आल्हाड यांना विद्युत समस्येबाबत निवेदन देण्यात आले. विद्युत पुरवठा हा सुरळीत करण्यासंदर्भामध्ये आपल्या स्तरावरून योग्य अशा प्रकारची सकारात्मक पावले उचलावी अशी विनंती श्री .शेलार साहेब यांनी केली.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!