श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

अमोलराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त अमोलराजे भोसले मित्र परिवारच्या वतीने शुक्रवारी शहरातील गरजू, वृद्ध, दिव्यांग, निराधार अशा २०० लोकांना साड्या, धोतर, पँट-शर्टचे वाटप

निराधारांना मोठा आधार मिळाला आहे. हीच खरी परमेश्वराची सेवा असून, आम्हा निराधारा कडून अमोलराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त अमोलराजे भोसले मित्र परिवारच्या वतीने शुक्रवारी शहरातील गरजू, वृद्ध, दिव्यांग, निराधार अशा २०० लोकांना साड्या, धोतर, पँट-शर्टचे वाटप करण्यात आले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

दरम्यान न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे व सचिव शामराव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील माणिक पेठ, धर्मवीर संभाजीराजे चौक डबरे गल्ली, श्रीमंत विजयसिंहराजे भोसले चौक हन्नूर रोड या ठिकाणी गरजू, वृद्ध, दिव्यांग, निराधार अशा २०० लोकांना साड्या, धोतर, पँट-शर्टचे वाटप करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    

याप्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त संतोष भोसले, न्यासाचे मुख्य आचारी बाळासाहेब पोळ, मनोज निकम, सिद्धेश्वर मोरे, निखील पाटील, महादेव अनगले, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, गोटू माने, कुमार सलबत्ते, रोहन शिर्के, सौरभ मोरे, अभियंता अमित थोरात, चंद्रकांत हिबारे, शहाजीबापू यादव, पिंटू साठे, योगेश पवार, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, मित्रमंडळ बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

*चौकट :*
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त अमोलराजे भोसले मित्र परिवारच्या वतीने आम्हा निराधारांना मोठा आधार मिळाला आहे. हीच खरी परमेश्वराची सेवा असून, आम्हा निराधारा कडून अमोलराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
-विश्वनाथ मदने, धर्मवीर संभाजीराजे चौक, डबरे गल्ली, अक्कलकोट

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button