गावगाथा

ऐतिहासिक राम तलावात १०८ फूट उंचीची श्री स्वामी समर्थांची पंचधातूची मूर्ती व इतर प्रकल्पाचे भूमिपूजन अक्कलकोट संस्थानचे नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न.

३५ एकर परिसरात अक्कलकोट तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी रुग्णालय, स्वामी भक्तांसाठी भक्तनिवास, ध्यान साधनागृह, श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवन चरित्र साकारणार आहे

अक्कलकोट संस्थानचे व शहराचे नाव जागतिक स्तरावर पोहचावे आणि पर्यटन क्षेत्राला वाव मिळावा यासाठी अक्कलकोट संस्थानचे नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्तराजे भोसले हे अक्कलकोट शहरालगत असलेल्या ऐतिहासिक राम तलावात १०८ फूट उंचीची श्री स्वामी समर्थांची पंचधातूची मूर्ती व त्या बाजूच्या ३५ एकर परिसरात अक्कलकोट तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी रुग्णालय, स्वामी भक्तांसाठी भक्तनिवास, ध्यान साधनागृह, श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवन चरित्र साकारणार आहेत. १०८ फूट उंचीची मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार श्री भगवान रामपुरे हे बनविणार असून त्याची तयारी सुरू झालेली आहे.

या प्रकल्पाचे भूमिपूजन आज गुरुवार दिनांक १६.११.२०२३ रोजी सकाळी ८ वाजता अक्कलकोट संस्थानचे नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे बंधू श्रीमंत सयाजीराजे भोसले व मामा श्री आशिष कदम, जगविख्यात शिल्पकार श्री भगवान रामपुरे, सिने अभिनेता अशोक कुलकर्णी, पवन कुलकर्णी गुरुजी, राहुल पाबळकर, अमित आलुरकर, निरव झमतानी, अक्षय सतीश चव्हाण, कुणाल सुनील भोसले, अभिषेक सिंह गौर, गणेश बडे, डॉ. विपुल शहा, जयसिंह पाटील, रोहित जिरोळे, शक्ती टोने, रोहन जिरोळे ,लक्ष्मण रामपूरे , श्रीपाद पुजारी , अशोक पाटिल, सिद्धार्थ बिंदगे, गणेश दिवाणजी , शशिकांत लिंबितोटे, किरण करत, शेकप्पा माने हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button