चुंगीची नातीचा अमेरिकेत झेंडा,मोदीसमोर गाणार अमेरिकेचे राष्ट्रगीत…….
चुंगीची नातीचा अमेरिकेत झेंडा,मोदीसमोर गाणार अमेरिकेचे राष्ट्रगीत.......

चुंगीची नातीचा अमेरिकेत झेंडा,मोदीसमोर गाणार अमेरिकेचे राष्ट्रगीत…….

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील चुंगीची नात रिया राहुल पवार (वय 16) हीची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर अमेरिकन राष्ट्रगीत सादर करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
तिला मिळालेल्या या संधीमुळे रियाने सोलापूर जिल्ह्याचा लौकिक साता समुद्रा पार पोहोचवला आहे.
रिया मूळची चुंगीची.
तिचे आजोबा विठ्ठल भोसले नोकरीसाठी वालचंदनगर येथे स्थायिक झाले.
आई श्रद्धा आणि वडील
राहुल पवार सध्या नोकरीनिमित्त अमेरिकेत न्यू जर्सी येथे राहतात. रियाचे बालपण इथेच गेले. पाचव्या वर्षापासून तिला भारतीय संगीताची आवड निर्माण झाली. हेमंत कुलकर्णी यांच्याकडे तिने भारतीय संगीताचे शिक्षण घेतले आहे.
पाश्चात्य संगीतानेही तिला भुरळ घातली.
बॉलीवूड आणि वेस्टर्न म्युझिक मध्ये तिने अनेक स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळवले आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून तीन दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी भारतीय वंशाच्या समूहाशी ते संवाद साधणार आहेत.
यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि त्यांच्या पत्नी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. गाण्यातील तिचे नैपुण्य आणि सुरेल आवाज यामुळे तिला ही संधी मिळाली आहे.
