पालकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्या बरोबरच चांगले संस्कार देणे काळाची गरज ; प्रा.भिमाशंकर बिराजदार
नीट परिक्षेमध्ये 720 पैकी 685 गुण मिळविणार्या कु.गिरीजा शिंदे, 720 पैकी 630 गुण मिळविणार्या कु.माळी यांचा सन्मान करण्यात आला.

पालकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्या बरोबरच चांगले संस्कार देणे काळाची गरज ; प्रा.भिमाशंकर बिराजदार

समर्थ प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर अक्कलकोट येथे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश हिंडोळे, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, भाजपा ज्येष्ठ नेते मल्लिनाथ स्वामी, शिवशरण वाले, श्रीमती मलम्मा पसारे, प्रांतपाल ला.राजशेखर कापसे, स्वामी समर्थ सूतगिरणीचे व्हा.चेअरमन राजशेखर हिप्परगी, शिवकुमार कापसे, प्रशांत लोकापुरे, उद्योगपती सुनिल गोरे, बाजार समितीचे संचालक बसवराज माशाळे, रजाक सय्यद, प्रशांत शिंपी आदीजण उपस्थित होते.

पुढे बोलताना बिराजदार म्हणाले, सध्या स्पर्धात्मक प्रत्येक विद्यार्थ्यांनी हिरहिरीने सर्व क्षेत्रात भाग घेतले पाहिजे. विजयाचा आनंद, पराजयाला निराश न होता, प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. एक दिवस यश तुमच्या पदरी पडल्याशिवाय राहणार नाही, असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलून, प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला उच्च शिक्षित करीत असताना आपल्या भारतीय संस्काराचे व परंपरेचे ज्ञान देणे काळाची गरज असल्याचे बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महेश हिंडोळे म्हणाले, समर्थ प्रतिष्ठानने गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्या बरोबरच गुणवंतांचा गुणगौरव कार्यक्रम करीत असते. कोरोना-कोवीड बंद पडले होते. यंदाच्या वर्षापासून पुन्हा चालु करण्यात आले असून समाजाचे ऋण फेडण्यासाठी काही तरी आपण देणे लागतो, यासाठी आपण सामाजिक कार्या बरोबरच गुणवंतांचा सन्मान करुन त्यांचा शाबासकीचे थाप देण्याचे काम संस्थेने चालु केले असल्याचे हिंडोळे यांनी सांगितले.

यावेळी प्रा.रेवणप्पा पाटील, नरेश कल्लुरकर, श्रीकांत झिपरे, राजकुमार एकबोटे, संजीव चनशेट्टी, कल्याणी पाटील, सचिव दयानंद बिडवे, उपाध्यक्ष संतोष घिवारे, अनिल बिडवे, रवि वाघमोडे, जगदीश शेटे, कांतु धनशेट्टी, शिवानंद भालके यांच्यासह विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेघा म्हेत्रे, प्रतिक भरमशेट्टी, दुर्गा भगरे, सायली पाटील, विपुलराज प्रधान, समृध्दी भालके, अभिषेक झिपरे, धानेश्वरी भुर्ले, साक्षी सोलनकर, धोंडप्पा पोरे, विठ्ठल वाडी, अभिषेक कुंभार, ईशांत नारंगकर, शिवानी भोसले, स्वामीनी मुदगुंडे, बुसेरा तांबोळी, जुल्फीया तांबोळी, शिवाजी रजपूत, भाग्यश्री घोडके, सोनाली नडगम, समर्थ धनशेट्टी, प्रिती सुतार, गायत्री किरनळ्ळी, रुपाली पाटील, साक्षी लोंढे, सुमैय्या शेख, गायत्री क्षिरसागर, तरनुम्म नागुुरे, अर्पिता भोसले, निजगुण गड्डद, भूमिका डोंगरीतोट, ओम चनशेट्टी, युवराज सिंदगी, अण्णविरेश्वर हिरेमठ, विश्वास जुजगार, श्रृष्टी दलवाई, साक्षी मुंडोडगी, स्नेहल संगापुरे, ऋतुजा भोसले, निकिता गवंडी, दिव्या म्हेत्रे, प्रथमेश इंगळे , ऋतुजा गायकवाड, प्रज्वला धोडमनी, मानसी कांबळे, अनिता पाटील या गुणवंत विद्यार्थ्यांचा समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने गुणगौरव करण्यात आला.
नीट परिक्षेमध्ये 720 पैकी 685 गुण मिळविणार्या कु.गिरीजा शिंदे, 720 पैकी 630 गुण मिळविणार्या कु.माळी यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नितीन पाटील तर आभार पार्वती संगापुरे यांनी मानले.