वागदरीचे स्वातंत्र्य सैनिक स्व.परममेश्वर सुरवसे यांचे वारसदार श्री संजय सुरवसे यांचा सत्कार
ऑगष्ट क्रांती दिनानिमित्त राष्ट्रीय नाभिक संघटना सोलापूर जिल्हा, क्रांती मित्र सामाजिक संस्था महाराष्ट्र

वागदरीचे स्वातंत्र्य सैनिक स्व.परममेश्वर सुरवसे यांचे वारसदार श्री संजय सुरवसे यांचा सत्कार

ऑगष्ट क्रांती दिनानिमित्त राष्ट्रीय नाभिक संघटना सोलापूर जिल्हा, क्रांती मित्र सामाजिक संस्था महाराष्ट्र, यांच्यावतीने नाभिक समाजातील स्वातंत्र सैनिक वारसदारांना सत्कार

9ऑगष्ट क्रांती दिनानिमित्त हुतात्मा स्मारक, जिजामाता उद्यान शेजारी ,पंढरपूर.येथे राष्ट्रीय नाभिक संघटना सोलापूर जिल्हा, क्रांती मित्र सामाजिक संस्था महाराष्ट्र, यांच्यावतीने नाभिक समाजातील स्वातंत्र सैनिक वारस सन्मान सोहळा2023 निमित्त वागदरीचे स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी श्री परममेश्वर सुरवसे यांचे वारसदार श्री संजय सुरवसे(अक्कलकोट तालुका अध्यक्ष नाभिक टायगर सेना महाराष्ट्र राज्य) यांचे मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पहार व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.यावेळी नाभिक समाजातील इतर स्वातंत्र्य सैनिक वारसदाराना सन्मानीत करण्यात आले. यावेळी डॉ. पांडुरंग जगताप, मयुरशेठ, अरूण जाधव, बबन शेटे, पांडुरंग चौधरी सर, कुसुमताई क्षीरसागर, श्रीराम ताटे व ज्ञानेश्वर गायकवाड या मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आले यावेळी सुधीर भाऊ गाडेकर, मल्लीनाथ चौधरी सर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन किरण भांगे, तुकाराम चव्हाण, जितेंद्र भोसले आणि सहकारी अतिशय सुंदर उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केले यावेळी पंढरपूर शहर आणि तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील नाभिक समाज बांधव उपस्थित होते.
