शरीर सुदृढ करण्यासाठी मुलांनी मैदानी खेळाकडे आकर्षित व्हावे –मल्लिकार्जुन मसुती
सौ सुरेखा कल्याणशेट्टी उच्च माध्यमिक विद्यालयात क्रीडा सप्ताहाचा शुभारंभ
अक्कलकोट :
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, गुगल या मुळे विज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती झाली आहे. परंतु मैदानी खेळाकडे दुर्लक्ष झाले आहे. शरीर सुदृढ व निरोगी असावे असे वाटत असेल तर मुलांनी मैदानी खेळ खेळावेत असे प्रतिपादन मल्लिकार्जुन मसुती यांनी केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित सौ सुरेखा कल्याणशेट्टी उच्च माध्यमिक विद्यालयाने आयोजित केलेल्या क्रीडा सप्ताहाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, विभाग प्रमुख पूनम कोकळगी, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट,भालाफेक,थाळीफेक, गोळाफेक या क्रीडा प्रकारासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे शरीरातील अवयव सदृढ होतात. त्यातून निरोगी जीवनाची प्राप्ती होते. म्हणून मैदानी खेळ महत्त्वाचे आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी यांनी केले, आभार प्रा सलोनी शहा यांनी मानले, कार्यक्रमास प्रा गुरुशांत हपाळे, कुमार जाधव, चंद्रकांत बिराजदार, प्रा मधुबाला लोणारी, शितल टिंगरे, सविता स्वामी, शितल फुटाणे, शिवकुमार मठदेवरू, शिल्पा धूमशेट्टी उपस्थित होते.
चौकटीतील मजकूर
क्रीडा सप्ताहातील मैदानी खेळ
कल्याणशेट्टी उच्च माध्यमिक विद्यालयाने आयोजित केलेल्या क्रीडा सप्ताहामध्ये कबड्डी, खो-खो, भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक,आदी मैदानी सामने होणार आहेत.
फोटो ओळ
क्रीडा सप्ताहाचा प्रारंभ करताना मल्लिकार्जुन मसुती मल्लिनाथ कल्याणशेट्टी व मान्यवर
Back to top button
×
No WhatsApp Number Found!