कल्याणशेट्टी महाविद्यालयात डॉ आंबेडकर महापरीनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम
राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचा उपक्रम
अक्कलकोट :
डॉ आंबेडकर अमर रहे संविधानाचा विजय असो, हमारा देश हमारा संविधान, अशा घोषणा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉ आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन आयोजित अभिवादन कार्यक्रमात दिल्या
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र अभ्यास मंडळ यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ आंबेडकर यांना अभिवादन करून जोरदार घोषणा दिल्या यावेळी प्रा मधुबाला लोणारी, शितल फुटाणे,सोनाली कटकधोंड, ओंकार धीवारे उपस्थित होते.
प्रारंभी प्रा सौरभ भस्मे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.
उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विद्यमान आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, सचिव मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य डॉ एस आर लोखंडे, जुनिअर विभाग प्रमुख पुनम कोकळगी, सेमी विभाग प्रमुख रूपाली शहा, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी अभिनंदन केले आहे
फोटो ओळ
डॉ आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेस अभिवादन करताना विद्यालयातील विद्यार्थी
Back to top button
×
No WhatsApp Number Found!