![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/07/thumb_600_500_treenrLU.jpg)
राज्यभरात एजेएफसी चा वृक्षलागवड पंधरवाडा
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
एक पत्रकार एक वृक्ष लागवड मोहीम राबविणार !
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
प्रतिनीधी
अकोला – ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल या राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने राज्य भरात एक पत्रकार एक वृक्ष लागवड ही मोहीमवृक्ष लागवड पंधरवाडा अंतर्गत येत्या 10 जुलैपासून राबविण्यात येणार आहे .10 ते 25 जुलै पर्यंत वृक्ष लागवड पंधरवड्यात विविध जातीचे वृक्षलागवड करण्यात येऊन त्याच्या संवर्धनाची प्रतिज्ञासुद्धा घेण्यात येणार आहे.निसर्गाने मानवालाअमूल्य असे दान दिले आहे. आपणआयुष्यभर निसर्गाचे ऋणी आहोत.त्यामुळे या निसर्गाचे ऋण फेडण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे .या भावनेतून ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल च्या वतीने महाराष्ट्र राज्यात सर्वदूर एक पत्रकार एक वृक्ष लागवड ही मोहीम राबविल्या जाणार आहे .या मोहिमेत राज्यभरातील पत्रकारां समवेत विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था संघटना यांचा सुद्धा सहभाग राहणार आहे.आपल्या गाव परिसरात, मोकळ्या जागेत, शासकीय खुल्या जागेत, मंदिर शैक्षणिक संकुल यांच्या प्रांगणात संबंधितांची परवानगी घेऊन वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी ,पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी,वाढत्या तापमानाचा मुकाबला करण्यासाठी यासोबतच भूगर्भातील जल पातळी वाढविण्यासाठी वृक्ष लागवड होणे तितकेच गरजेचे आहे.वृक्ष लागवडी नंतर निसर्गाप्रती असलेले ऋण फेडण्याचा प्रयत्न ए जे एफ सी या राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे. नुकताच ए जेएफसी संघटनेच्या झालेल्या ऑन लाईन बैठकीत वृक्ष लागवड पंधरवड्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीला एजेएफसीचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, केंद्रीय समिती पदाधिकारी अभिमन्यू लोंढे,गणेश गोडसे, निलेश पोटे, महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष राहुल कुलट आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. राज्यभराती ए जे एफ सी पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी व सन्मानिय सदस्यांनी वृक्ष लागवड पंधरवड्यात उत्स्फूर्त सहभाग घेऊन मोठ्या संख्येत वृक्ष लागवड करावी तसेच वृक्ष लागवडी चे छायाचित्र संघटनेच्या व्हाट्सप ग्रूप वर पोस्ट करावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)