पत्रकारांचे आरोग्य जपणे महत्वाचे: प्रभारी कुलगुरू डॉ. कामत*
सोलापूर विद्यापीठामार्फत पत्रकारांसाठी ॲक्युप्रेशर प्रशिक्षण शिबिर*
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230710-WA0037-780x470.jpg)
पत्रकारांचे आरोग्य जपणे महत्वाचे: प्रभारी कुलगुरू डॉ. कामत*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
सोलापूर विद्यापीठामार्फत पत्रकारांसाठी ॲक्युप्रेशर प्रशिक्षण शिबिर*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
सोलापूर, दि. १०- पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्या जागरूकतेने समाजाचे आरोग्य चांगले राहू शकते. पत्रकारिता क्षेत्रातील धकाधकीच्या जीवनशैलीमुळे पत्रकारांना वेळोवेळी आरोग्याशी निगडीत समस्यांना सामोरे जावे लागते. जिथे वैद्यकीय उपचार उपलब्ध नसतील, तिथे तातडीच्या वेळी उपचार म्हणून ॲक्युप्रेशर चिकित्सा व उपचार पद्धत अत्यंत उपयुक्त ठरू शकते, असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी व्यक्त केले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आरोग्य विज्ञान संकुल व नागपूर येथील श्री साई समर्थ मेडिकल एज्युकेशनल अँड रिसर्च सोसायटी व सोलापूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरातील पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या ॲक्युप्रेशर प्रशिक्षण व उपचार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रभारी कुलगुरू डॉ. कामत हे बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, शिक्षण सहसंचालक डॉ. काकडे, डॉ. विकास घुटे, विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप, प्रशिक्षक पराग कुलकर्णी, भवतिक जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
पत्रकारांच्या आरोग्यासाठी विद्यापीठाने आयोजित केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असून अशा प्रकारचे उपक्रम भविष्यात देखील घेण्यात यावेत, अशी अपेक्षा पत्रकार संघाचे अध्यक्ष खेलबुडे यांनी व्यक्त केली. यावेळी आरोग्य विज्ञान संकुलातर्फे चालू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती संकुलाचे समन्वयक डॉ. अभिजित जगताप यांनी दिली. तसेच यावेळी संकुलातर्फे चालू करण्यात आलेल्या एक्यूप्रेशर कन्सल्टन्सीचे उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते पार पडले. श्री.साई समर्थ एज्युकेशनल सोसायटीचे अध्यक्ष पराग कुलकर्णी यांनी यावेळी उपस्थितांना एक्यूप्रेशर चिकित्सेबद्दल माहिती व प्रशिक्षण दिले. श्रमिक पत्रकार संघाचे विविध सदस्य व पत्रकारांनी या शिबिराचा लाभ घेतला
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)