छावा चित्रपट पाहून जिल्हा परिषदेची मुले भारावली
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना छावा चित्रपट दाखविण्यासाठी बुधवार पेठेतील साईनाथ मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियुष शहा यांनी पुढाकार घेतला

छावा चित्रपट पाहून जिल्हा परिषदेची मुले भारावली
pune : जिल्हा प्राथमिक शाळा ठाकरवाडी (ता. हवेली) येथील विद्यार्थ्यांना शनिवारी ‘छावा’ चित्रपट दाखविण्यात आला. हा चित्रपट पाहून विद्यार्थी अक्षरश: भारावले. चित्रपट संपल्यानंतर या विद्यार्थ्यांनी चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ’जय भवानी’ आदी घोषणाही दिल्या. विद्यार्थ्यांनी दिलेल्या या घोषणांना चित्रपट गृहातील उपस्थितांनीही प्रतिसाद दिला.
नवज्योत मित्र मंडळ यरवडा व युगंधर मित्र मंडळ सनसिटी रस्ता या दोन मंडळांनी या विद्यार्थ्यांना सिंहगड रस्त्यावरील फन टाईम चित्रपटगृहात चित्रपट दाखविला. तसेच चित्रपटाच्या प्रारंभी आणि चित्रपट संपल्यानंतर या मंडळांकडून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या खाऊचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना छावा चित्रपट दाखविण्यासाठी बुधवार पेठेतील साईनाथ मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियुष शहा यांनी पुढाकार घेतला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट पाहण्याची विद्यार्थ्यांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे चित्रपटाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. चित्रपट संपल्यानंतर चांगला चित्रपट पाहिल्याचा आनंद या विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर झळकत होता.
या उपक्रमासाठी केंद्र प्रमुख मोहन भालचिम, केंद्र समन्वयक किशोर भवाळकर यांनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थ्यांसह शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापक मनिषा बुंदे, नवज्योत मित्र मंडळाचे अध्यक्ष अमित जाधव, युगंधर मित्र मंडळाचे अध्यक्ष मयुर पोटे, फन टाईम चित्रपटगृहाचे व्यवस्थापक संदिप कांबळे, श्वेता जाधव, समर्थ जाधव, रवींद्र पायगुडे, सुवर्णा पायगुडे, दिपाली पारगे, अलका पारगे आदी उपस्थित होते.
