अभिनंदन.,…निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी संतोष शिंदे यांची निवड!
निवड नियुक्ती

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी संतोष शिंदे यांची निवड!

अहमदनगर प्रतिनिधी:

काष्टी येथील रहिवासी पत्रकार, साहित्यिक संतोष शिंदे यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (महाराष्ट्र) संस्थेच्या अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी संतोष शिंदे यांची निवड सन २०२३ ते २०२६ या कालावधीकरता निवड केली आहे.

राज्याध्यक्ष प्रमोद दादा मोरे ,सचिव वनश्री मोरे,राज्य पदाधिकारी प्रमोद काकडे,सुभाष वाखारे, राजेंद्र भोसले, छायाताई राजपूत,नगर जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसूळ, प्रकाश केदारी,अनिल लोखंडे, चंद्रकांत भोजने, अण्णासाहेब साळवे,विजय बोडके, ज्ञानेश्वर गोरे, लतिकाताई पवार यांच्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली.

संतोष शिंदे यांनी पर्यावरण व वृक्षसंवर्धन जनजागृतीसाठी प्रबोधनात्मक लेखन केले आहे.पर्यावरण वृक्षसंवर्धनासठी जनजागृती ते करत आहेत.नुकतेच निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष संतोष परदेशी यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.यावेळी साहित्यिक व वृक्षप्रेमी शेखर फराटे उपस्थित होते.
