वागदरी 19 व 20 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या श्री परमेश्वर पर्व आराधना पालखी महोत्सव सोहळ्याचे नागणसूर विरक्तमठाचे डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजी निमंत्रण ….
श्री परमेश्वर पर्व पालखी महोत्सव 2024

वागदरी 19 व 20 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या श्री परमेश्वर पर्व आराधना पालखी महोत्सव सोहळ्याचे नागणसूर विरक्तमठाचे डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजी निमंत्रण ….

वागदरी/ अक्कलकोट — यावर्षी सप्टेंबर 19 आणि 20 रोजी होणाऱ्या वागदरी ग्रामदैवत श्री परमेश्वर यांचे पर्व पालखी महोत्सवामधे सहभागी होऊन भक्तांना महाप्रसाद बरोबर ज्ञान प्रसाद देण्यासाठी महोत्सवात सहभागी होण्यासाठी वागदरी श्री परमेश्वर पंच कमिटीचे सदस्यांनी रविवारी गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर नागणसूर विरक्तमठचे डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजी आणि सोलापूर किरीट मठाचे स्वामीनाथ महास्वामीजी आणि वागदरी विरक्त मठाचे शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांना निमंत्रण दिले.
नेहमीप्रमाणे रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त तालुक्यातील वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वर पर्व पंच कमिटीचे सदस्यांनी वाहनाने जाऊन महास्वामीजींना अधिकृत निमंत्रण दिले. कार्यक्रमाचा आराखडा ऐकून नागणसूरचे स्वामीजी या महोत्सवाला नक्की येईन,असे सांगुन नागणसूर मठाचे भक्तांच्या सहकार्याने निर्माण होत असलेले अडीच कोटी रुपयाचे सांस्कृतिक भवनाचे कामगारी दाखविले व दसऱ्याच्या वेळी नागणसूर मध्ये होणाऱ्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी वागदरीच्या पंचकमितीला आमंत्रण दिले.
समितीचे सदस्य जागतिक लिंगायत महासभा वागदरीचे अध्यक्ष शरणप्पा मंगाणे वागदरीचे सरपंच श्रीकांत भैरमडगी यांनी महास्वामीजींचे पाद पूजा करून सत्कार केले .घाळय्या मठपती , शरणप्पा मंगाणे, अशोक पोमाजी, कमिटी चे सचिव शांतेश्वर कोटे, सोलापूर जिल्हा जागतिक लिंगायत महासभेचे अध्यक्ष शिवानंद गोगाव , सोमणप्पा खैराटे, परमेश्वर यमाजी, शिवशरण बिराजदार , हणमंत सलगरे, सिद्धराम बिराजदार, सुरेश पोमाजी,हणमंत ठोंबरे, अनिल पुरंत,अक्कलकोट प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष बसवराज खिलारी, धर्मराज बिराजदार निवृत्त विस्तार अधिकारी धर्मा प्रचंडे, श्रीशैल फुलारी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
