वैशाली निगंदळे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कर्तृत्वान महिलांचा सत्कार.
वाढदिवस विशेष

वैशाली निगंदळे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कर्तृत्वान महिलांचा सत्कार.

अक्कलकोट दि.११ सोमवार. अक्कलकोट तालुका शिवसेना कमगार सेना व शिवसेना महिला आघाडी च्या वतीने कामसेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे यांची मुलगी सौ वैशाली निगंदळे यांच्या एकोणतीसाव्या वाढदिवसानिमित्त लोकापुरे फंक्शन हाॅल येथे विविध क्षेत्रातील कर्तृत्वान एकोणतीस महिलांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख रविनाताई राठोड व तालुकाप्रमुख संजय देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले यावेळी मंचावर विधानसभा संघटक प्रा.सुर्यकांत कडबगावकर मिहिला आघाडी तालुकाप्रमुख सौ.वर्षाताई चव्हाण शहरप्रमुख वैशालीताई हावनूर कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे हन्नुरचे उपसरपंच शरणप्पा हेगडे चंद्रकांत वेदपाठक विनोद मदने उपस्थिती होते. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते स्वामी समर्थ महाराजाच्या प्रतीमेचे पुजा करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले. मान्यवरांचे सत्कार स्वामीनाथ हेगडे व वैशाली हावनूर यानी केले. एकोणतीस विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचे सत्कार करण्यात आले त्यानंतर सौ वैशाली निंगदळे व संगमेश्वर निगंदळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन वाढदिवसाचे केक कापण्यात आले.यावेळी तालुकाप्रमुख सजंय देशमुख यानी सौ.वैशाली निगंदळे व सन्मानीत एकोणतीस महिलाना पुढील कार्यास शुभेच्छा दिले यावेळी कामगार सेना महिला शहरप्रमुख जयश्री कोलाटी शहर उपप्रमुख वर्षाताई मेत्रे अश्विनी पाटील महादेवी खुबा कामगार सेना महिला आघाडी मुजावर मॅडम व इतर लोक उपस्थित होते.सूत्रसंचालन संगमेश्वर निगंदळे यानी केले आभार प्रा.सुर्यकांत कडबगांवकर यानी कले
