प्रेरणादायक

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची संवेदनशीलता अहमदनगरच्या वारकऱ्याचे प्राण वाचवण्यात यश….

वेळीच उपचार मिळाल्याने अनर्थ टळला एका वारकऱ्यासाठी मध्यरात्री अख्खी यंत्रणा राबली; हार्ट अटॅकनंतर मृत्यूच्या दारातून परत आणलं!

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची संवेदनशीलता अहमदनगरच्या वारकऱ्याचे प्राण वाचवण्यात यश….
वेळीच उपचार मिळाल्याने अनर्थ टळला
एका वारकऱ्यासाठी मध्यरात्री अख्खी यंत्रणा राबली; हार्ट अटॅकनंतर मृत्यूच्या दारातून परत आणलं!

HTML img Tag Simply Easy Learning    

: वारकरी शामराव घोलप यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना मध्यरात्री फोन करून दुसऱ्या एका वारकऱ्यासोबत झालेल्या घटनेची माहिती देत मदत मागितली होती.

HTML img Tag Simply Easy Learning    

अहमदनगर : आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. वारकऱ्यांना मुलभूत सोयी-सुविधा देण्याच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. अहमदनगर जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या “वारी आपल्या दारी” या संपर्क सुचिमुळे तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संवेदनशीलतेमुळे अहमदनगरच्या वारकऱ्याचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
शनिवारी २४ जून रोजी अहमदनगर जिल्ह्यातील भातोडे या गावचे वारकरी सुभाष काशिनाथ पवार यांना रात्री अडीच वाजता करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी या ठिकाणी हृदयविकाराचा झटका आला. पवार यांच्यासोबत असलेले वारकरी शामराव घोलप यांनी “वारी आपल्या दारी” या संपर्क सूचीमधून मोबाईल क्रमांक पाहात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना मध्यरात्री फोन करून घटनेची माहिती देत मदत मागितली.
जिल्हाधिकारी सालीमठ यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न करता सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांना पहाटे पावणे तीन वाजता दूरध्वनीद्वारे संपर्क करून घटनेची माहिती दिली. वारकरी पवार यांना वैद्यकीय सेवा मिळवून देण्याची सूचना केली.
दरम्यान, सोलापूर प्रशासनाने तत्परता दाखवत रुग्णवाहिका उपलब्ध करून देत वारकऱ्याला वैद्यकीय सेवा दिली. तत्परतेने व वेळेत वैद्यकीय सेवा मिळाल्याने वारकरी सुभाष पवार यांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button