
हन्नूर च्या अनंत चैतन्य प्रशालेचा चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल १०० टक्के –

–————————————— राज्याच्या कला संचालनालयाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या शासकीय रेखाकला ड्रॉइंग ग्रेड परीक्षा ज्याची प्रमाणपत्रे दृककलांच्या विशेष उच्च अभ्यासक्रमाकरिता प्रवेश मिळवण्यासाठी महत्वपूर्ण मानली जातात अशा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था,अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य प्रशाला,हन्नूर च्या एकुण ६१विद्यार्थ्यांना बसविण्यात आले होते. पैकी एकुण ४५ विद्यार्थी हे एलिमेंटरी परीक्षेकरिता प्रविष्ट झाले होते ज्यापैकी ५विद्यार्थी ‘ए’ ग्रेड ने, ५ विद्यार्थी ‘बी’ ग्रेड ने तर उर्वरित ३५ विद्यार्थी ‘ सी’ ग्रेड ने उत्तीर्ण झाले. तसेच इंटरमिजिएट परीक्षेकरिता प्रशालेकडून १६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यातील ४ विद्यार्थी ‘ए’ ग्रेड ने ,५ विद्यार्थी ‘बी ‘ ग्रेड ने तर ७ विद्यार्थी ‘ सी’ ग्रेड ने उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री. राजेंद्र यंदे यांचे मार्गदर्शन लाभले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक श्री.राजेंद्र यंदे यांचे संस्थेचे अध्यक्ष व आमदार मा. सचिनदादा कल्याणशेट्टी, संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक मा. श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी,प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारवड मा. श्री. सिध्देश्वर कल्याणशेट्टी,संस्थेच्या संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी,मुख्याध्यापक श्री. विलास बिराजदार,पर्यवेक्षक श्री. अशोक साखरे यांनी विशेष अभिनंदन केले.
