गावगाथा

*नव संशोधकांनी स्थानिक इतिहास जागतिक स्तरांपर्यंत पोहोचवावा : मल्लिनाथ कल्याणशेट्टी*

*विद्यार्थी इतिहास परिषदेच्या राज्यस्तरीय २० वे अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी प्रतिपादन*

*नव संशोधकांनी स्थानिक इतिहास जागतिक स्तरांपर्यंत पोहोचवावा : मल्लिनाथ कल्याणशेट्टी*

*विद्यार्थी इतिहास परिषदेच्या राज्यस्तरीय २० वे अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी प्रतिपादन*

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यास सामाजिक, सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक वारसा लाभला आहे. विविध धार्मिक व सांस्कृतिक सन, उत्सव, परंपरा तसेच पंढरीची वारी, नंदिकोन यात्रा सोबतच असंख्य शिलालेख, विरगळ, किल्ले, गढी, मंदिरांमुळे जिल्ह्यास वैभव प्राप्त झाले आहे म्हणून स्थानिक इतिहासावर संशोधन करून नव संशोधकांनी आपल्या परिसराचा इतिहास जागतिक स्तरांपर्यंत पोहोचवावा असे प्रतिपादन अक्कलकोट येथील महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले.

सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात इतिहास विभागाने आयोजित केलेल्या विद्यार्थी इतिहास परिषदेच्या राज्यस्तरीय विसाव्या अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एम. ए. शेख होते. व्यासपीठावर प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी, प्रा. नामदेवराव गरड, डॉ. नभा काकडे, प्रा. एम. एम. मस्के, डॉ. मल्लिनाथ अंजुनगीकर, सचिन अणवेकर, ऋतुराज चौसाळकर, परिषदेच्या अध्यक्षा अर्चना गुडशेल्लू आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना कल्याणशेट्टी म्हणाले की, जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुर्मिळ मंदिरे आहेत. त्यामुळे उत्सव व यात्रेची परंपरा आहे. त्याचेही संशोधन होणे गरजेचे आहे .

प्राचार्य एम. ए. शेख म्हणाले की, विद्यार्थ्यांनी दुर्मिळ संदर्भ साधनांचा अभ्यास करून आपल्या संशोधनास गती दिले पाहिजे. दर्जेदार व समाजोपयोगी संशोधनास न्याय मिळतो याची खात्री बाळगली पाहिजे.

प्रा. नामदेवराव गरड म्हणाले की, विद्यार्थी परिषदांमधून नव संशोधकांना संशोधन करण्याची प्रेरणा मिळते. म्हणून शाळा महाविद्यालयातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लेखन करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते उत्कृष्ठ शोध निबंध लेखकास सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्र व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. एम. एम. मस्के यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. सोनाली गिरी यांनी तर आभार डॉ. दशरथ रसाळ यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, प्रा. संतोष मारकवाड, श्याम साळुंखे, हमीद पठाण, अशोक इंगोले, नियाज शेख, लता रोमन, योगेश पोळ यांनी प्रयत्न केले.

*फोटो ओळ: उत्कृष्ठ शोध निबंध लेखकांच्या समवेत मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्राचार्य एम. ए. शेख, प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी, प्रा. नामदेवराव गरड, डॉ. नभा काकडे, प्रा. एम. एम. मस्के, परिषदेच्या अध्यक्षा अर्चना गुडशेल्लू आदी*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button