चित्रपट विषयक

वटवृक्ष मंदीरात श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा चित्रपट चित्रीकरणाचे शुभारंभ

वटवृक्ष मंदीरात श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा चित्रपट चित्रीकरणाचे शुभारंभ प्रसंगी महेश इंगळे, सुहास पाटील, रमेश चावरे व अन्य.

वटवृक्ष मंदीरात श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा चित्रपट चित्रीकरणाचे शुभारंभ

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१३/८/२३) –
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने
‘श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा’ चित्रपटाचा शुभारंभ सोहळा नुकतच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात देवस्थानचे अध्यक्ष व नगरसेवक महेश इंगळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना महेश इंगळे यांनी कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रा ही प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती निमित्त अक्कलकोटला येत असते. गेली सात वर्षे हे अखंडीत कार्य सुरू आहे. यामध्ये अनेक स्वामी भक्तांना अनुभव आले आहेत. या अनुभवास अनुसरून
कोल्हापूरचे निस्सीम स्वामी भक्त व कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेचे प्रमुख सुहास पाटील तसेच पदयात्रा भक्त मंडळींच्या वतीने या चित्रपट निर्मितीचा संकल्प केला आहे.
या चित्रपट निर्मितीस जी लागेल ती मदत करू, कारण आपण स्वामींचे अनुभव भक्तांसमोर आणून स्वामींच्या कार्याचा प्रचार प्रसार करत आहात ही अभिमानास्पद बाब आहे. स्वामींचा तुम्हाला आर्शिवाद आहेच. कथा, अनुभव सत्य घटनेवर आधारित असल्याने हा चित्रपट निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी पोहचणार आहे आणि स्वामीभक्त निश्चितच या चित्रपटाला दाद देतील आणि स्वामीभक्तीचे जीवनातील महत्त्व काय आहे हे या चित्रपटाच्या माध्यमातून रसिक भाविकांना निदर्शनास येईल याची आपल्याला खात्री आहे असे मनोगत व्यक्त केले.भाविकांच्या अनुभवांद्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. यातील सर्व प्रसंग सत्य कथेवर असून पदयात्रा चालक सुहास पाटील यांनी भक्तांचे अनुभव घेऊन कथा लिहिली आहे. याचे डायरेक्टर निलेश जाधव तर निर्माते रमेश चावरे आहेत. प्रमुख कलाकार म्हणून एन डी चौगुले, दादू संकपाळ, युवराज ओतारी, दीपक खटावकर, अश्विनी मोकाशी, गोपी वर्णे, साधना माळी आदी कलाकार भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे सर्व चित्रिकरण कोल्हापूर ते अक्कलकोट या मार्गावर होणार आहे. वटवृक्ष मंदिर येथे या चित्रिकरणाचा समारोप होणार आहे. वटवृक्ष मंदिरातील चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या शुभारंभ नंतर चित्रीकरणाची सुरुवात स्वामी जगदंब भक्त मिलिंद धोंड, स्वामी भक्त बाबा कोंडेकर, विजय वरुटे, अमर सरनाईक, सुनील चिले, विजय खानविलकर, सचिन कागले, मनोज माने, जगमोहन भुर्के या स्वामीं भक्तांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी पदयात्रेतील स्वामी भक्त रमेश चावरे, सुहास पाटील, निलेश जाधव, मनोज साळुंखे, किशोर चोपडे, यशवंत चव्हाण, अनिकेत परीट उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – वटवृक्ष मंदीरात श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा चित्रपट चित्रीकरणाचे शुभारंभ प्रसंगी महेश इंगळे, सुहास पाटील, रमेश चावरे व अन्य.

HTML img Tag Simply Easy Learning    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button