*चर्मकार विकास संघाच्या वतीने समाजाच्या न्याय, हक्कासाठी मंत्रालयात सचिव स्तरावर यशस्वी बैठक संपन्न!*
संत गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीची महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर करावी.जयंतीला शासनाकडून भरीव निधी द्यावा

*चर्मकार विकास संघाच्या वतीने समाजाच्या न्याय, हक्कासाठी मंत्रालयात सचिव स्तरावर यशस्वी बैठक संपन्न!*


मुंबई — चर्मकार विकास संघाच्या पुढाकाराने समाजाच्या वंचित प्रश्नाकरिता मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाचे सचिव मा. सुमंत भांगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच चर्मोद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मा.धम्मज्योती गजभिये साहेब व बार्टीचे महासंचालक मा.सुनील वारे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष मा.संजय खामकर साहेब, नगरसेविका मा.सौ आशाताई मराठे व राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी विशेष महिला पदाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत चर्मकार समाजाच्या अनेक वर्षापासून वंचित प्रश्नासंदर्भात यशस्वी बैठक संपन्न झाली.
चर्मकार समाजाच्या खालील मागण्या विषयी चर्चा करण्यात आली

# संत गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीची महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर करावी.जयंतीला शासनाकडून भरीव निधी द्यावा.
# सागर (मध्य प्रदेश ) येथे शंभर कोटीचे संत रविदास मंदिर उभे राहत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा संत रविदास महाराज यांचे विश्वविद्यापीठ स्थापन करण्यात यावे.
# चर्मउद्योग महामंडळाचे थकीत सर्व कर्ज सरसकट माफ करण्यात यावे. कर्जाची मर्यादा पंधरा लाखापासून १ कोटीपर्यंत करण्यात यावी नव्याने कर्ज वितरण करतांना सरळ पद्धतीने व जाचक अटी रद्द करावे सर्व कर्ज मंडळाच्या वतीने देण्यात यावे.
# महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात अद्यायावत संत रविदास विकास केंद्र उभारण्यात यावे. त्यात प्रशिक्षण केंद्र व संत रविदास महाराजांचे साहित्य व वाचनालय, अभ्यासिका अश्या विविध सुविधा युक्त समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता उपक्रम राबविण्यात यावे.
# कष्टकरी गटई कामगारांना आधुनिक दर्जाचे गटई स्टॉल देण्यात यावे अपघात विमा,आरोग्य विमा, घरकुल योजना पेन्शन योजना लागू करण्यात यावे.
# देवनार (मुंबई) येथील समाजाकरिता राखीव असलेली दहा एकर जागा ताब्यात घ्यावी व जागतिक दर्जाचे आधुनिक क्लस्टर व विक्री व्यवस्था करिता मार्केट हब, प्रशिक्षण केंद्र, निवासस्थान अशा सुविधेचे चर्म उद्योगाचे जागतिक दर्जाचे केंद्र उभारावे
# बार्टी संस्थेमार्फत राबवल्या जात असलेल्या विविध योजनांचा लाभ गरजवंत युवकांना मिळावा अनेक भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेल्या बार्टीचा कारभार पारदर्शक करण्यात यावा.
# बांद्रा मुंबई येथील एकमेव चर्मकला महाविद्यालय बंद अवस्थेत असून ते पुनर्जीवित करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा व विविध आधुनिक चर्मोद्योग व्यवसाय शिक्षण सुरू करावेत.
# चर्मकार कल्याण आयोगाला तात्काळ अध्यक्ष नेमून समाजाच्या कल्याणासाठी सर्व स्तरातील समाजाचे सर्वेक्षण करून सर्वांगीण विकासासाठी अभ्यासपूर्ण नियोजन करावे.
# संत रविदास महाराज पुरस्काराचे मागील तीन वर्षाचे पुरस्कार तात्काळ सन्मानपूर्वक वितरण करण्यात यावे इतर पुरस्कारार्थी प्रमाणे संत रविदास महाराज यांच्या पुरस्कारार्थी यांना सुविधा मिळाव्यात.
# परदेशी शिक्षणासाठी विद्यार्थी संख्या ५०० करण्यात यावी तसेच एमपीएससी, यूपीएससी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी संख्या १००० करण्यात यावी व प्रख्यात क्लास ची निवड करण्यात यावी.
# कोल्हापूर रायगड सह इतर विभागात सुद्धा आधुनिक क्लस्टर उभारण्यात यावे चर्मउद्योग वाढीसाठी ग्रामीण भागातील कारागिरांना प्रोत्साहन देण्यात यावे व आधुनिक चर्मउद्योग कारागीर वाढीसाठी प्रयत्न करावे.
# महाराष्ट्रात चर्मोद्योग वाढीसाठी छोटे-मोठे उद्योग उभारून नाममात्र व्याजासह युवा उद्योजकांना निधी उपलब्ध करून द्यावा. विक्री व्यवस्थेसाठी मार्केटिंग व्यवस्था निर्माण करावी विक्री छोटे मोठे उद्योजक यांना एकत्रित करून उद्योग वाढीसाठी प्रयत्न करावे.
# मुंबई नागपूर सह विविध शहरांमध्ये जागतिक दर्जाचे प्रदर्शन घेण्यात यावे. जगातील चर्म उद्योग व्यवसाय करणारे मोठे उद्योजक कंपन्या यांना निमंत्रित करण्यात यावे.
# प्रथमच शासन स्तरावर चर्मकार समाजाच्या वंचित प्रश्ना संदर्भात सविस्तर व सखोल चर्चा करण्यात आली.
प्रसंगी मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाष मराठे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश माने महिला प्रदेश कार्याध्यक्ष पूजा कांबळे प्रदेश सहसंघटक राजेश साबळे मुंबई प्रदेश सचिव राजनंदन चव्हाण वधुवर समिती अध्यक्ष रामदास सोनवणे मुंबई गटई अध्यक्ष अशोक कांबळे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र साळवे पुणे युवा जिल्हाध्यक्ष दीपक कांबळे मार्गदर्शक निलेश आहेर नाशिक जिल्हाध्यक्ष संदीप आहेर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रविकिरण गवळी संत रविदासांचे प्रचारक राजाभाऊ शिंदे कल्याण सचिव भिकन जाधव उल्हासनगर खजिनदार विलास भोळे ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक आगवणे नाशिक युवा जिल्हाध्यक्ष योगेश कांबळे रविदासया फाउंडेशनच्या संचालिका पद्मजा राजगुरू,संचालिका दिपाली कांबळे मार्गदर्शक व्यंकटराव दुढंबे,अंकुश जोगदंड परभणी मराठवाडा अध्यक्ष प्रा.गणेश कांबळे,मराठवाडा सचिव सुखदेव काटकर,समाजाच्या नेत्या दिपाली चिपळूणकर युवा महिला प्रदेशाध्यक्ष दिपाली दाभाडे दळवे, यवतमाळ महिला जिल्हाध्यक्ष अर्चना ईसलकर,जिल्हा युवा उपाध्यक्ष संदीप डोळस,वधु वर समिती खजिनदार अरुण गाडेकर,सेक्रेटरी रविदासया धर्म संघटनचे दिनेश देवरे, साहित्यिक प्रदेश अध्यक्ष सुभाष सोनवणे, अँण्ड. आदिनाथ बाचकर,औरंगाबाद जिल्हाध्यक्ष हरदास बावस्कर,नगर जिल्हाध्यक्ष संतोष कानडे,रायगड जिल्हाध्यक्ष संतोष सिमलकर, युवानेते गोपीचंद गुरव,राम कांबळे मुंबई महिला प्रदेश अध्यक्ष प्रियांका गजरे,सौ.सविता बोबडे,सौ. जोशना लोकरे, गटई सेल जिल्हाध्यक्ष रुपेश लोखंडे,सुवर्णा डोईफोडे,अँण्ड.आशा शिरसाट,विलास चौधरी, प्रदेश संघटक राजू गायकवाड,धरम शंकर गोविंद, आजिनाथ कांबळे, विजय शेळके, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभू पानझाडे,अविनाश यादव, मुंबई गटई आघाडी अरुण कदम, युवानेते गोपीचंद गुरव आधी महाराष्ट्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी पदाधिकारी यांनी विविध प्रश्न बैठकीत मांडले समाजाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारी बैठक सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अत्यंत उत्साही व सकारात्मक वातावरणात वैचारिक अशी बैठक संपन्न झाली सर्व प्रश्नांचे सविस्तर व तपशीलवार मार्गदर्शन करतांना मा.सुमंत भांगे साहेब म्हणाले पुढील काळात सर्व प्रश्नांचे सोडून करण्यात येईल असे आश्वासन दिले समाजाला न्याय देण्याचे सामाजिक न्याय विभाग प्रयत्न करेल मा.धम्मज्योती गजभिये साहेब व मा.सुनिल वारे साहेब यांनी मार्गदर्शन करतांना चर्मोद्योग महामंडळाच्या व बार्टीच्या नव्या योजना उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थित पदाधिकारी यांना देताना उपस्थित प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देतांना लवकरच सर्व मागण्यांची सोडवणूक करण्याकरिता शासन प्रयत्न करेल सदर बैठक ही तब्बल तीन तास गांभीर्यपूर्वक झाली दर महिन्याला अशा बैठकीचे नियोजन करण्याचे आश्वासन दिले पुढील काळात चर्मकार समाजाचे सर्व हिताचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन मा.भांगे साहेब यांनी अध्यक्षस्थानी मार्गदर्शन करताना सांगितले.चर्मकार विकास संघाच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करताना संत रविदास महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली. बैठकीचे सूत्रसंचालन संतोष कानडे यांनी केले.
