
पिकनिक पॉईंट हुरडा महोत्सवास प्रारंभ

महेश इंगळेंच्या हस्ते हुरडा महोत्सवाचे शुभारंभ

(प्रतिनिधी अक्कलकोट,


सोलापूरच्या पाकणी येथील पुणे हायवे लगत असलेल्या कन्हैयालाल झुला भोजन व पिकनिक पॉईंट मध्ये यंदाच्या हुरडा महोत्सवास नुकतेच प्रारंभ झाले. या हुरडा महोत्सवाचे शुभारंभ नुकतेच सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वायरलेस तांत्रिक पोलीस अधिकारी पुनम डांगे व सेवा सदन प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका मानसी दामले मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष, नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कन्हैयालाल झुला भोजन व पिकनिक पॉईंटचे मालक कपिल बजाज, मधुर बजाज, डॉ.स्वप्नाली बजाज, प्रितेश जाजू यांची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी भारतासारख्या कृषी प्रधान देशात आज पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण होताना दिसत आहे. त्या माध्यमातून बाहेर हॉटेलिंगची आजच्या तरुण पिढीमध्ये मानसिकता रुजलेली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर सारख्या स्मार्ट सिटीत कृषीप्रधान भारतीय संस्कृतीची परंपरा टिकविण्याकरिता व त्याची छबी आजच्या तरुणांच्या मानसिकतेत रुजविण्याकरिता अशा प्रकारचे हुरडा महोत्सव नेहमीच प्रेरणादायी ठरत आहेत अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले. यावेळी महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्यासह मंदिर समितीचे श्रीशैल गवंडी, संजय पवार, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, शिवशरण अचलेर आदींसह स्विमिंग ग्रुपचे सदस्य संतोष पराणे, अरविंद पाटील, ओंकार उटगे, श्रीकांत झिपरे, सुनील पवार, सचिन किरनळ्ळी, अशोक कलशेट्टी, बाबा सुरवसे, शेखर आडवीतोटे, शिवशंकर बिंदगे, अमर पाटील, बाळासाहेब एकबोटे, प्रसन्न हत्ते, काशिनाथ सोलनकर, मनोज इंगुले, शैलेश राठौर, खाजप्पा झंपले, काका सुतार, ज्ञानेश्वर भोसले, योगेश लोकापूरे, धनराज स्वामी आदींनी यावेळी मनसोक्त हुरड्याचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशरण अचलेर यांनी केले तर आभार कपिल बजाज यांनी मानले.
फोटो ओळ – पिकनिक पॉईंट महोत्सवाचा शुभारंभ व हुरड्याचा आस्वाद घेताना महेश इंगळे व स्विमिंग ग्रुपचे सहकारी दिसत आहेत.