गावगाथा

अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणेश जयंती उत्सव न्यासाच्या परिसरात असलेल्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी

गणेश जयंती विशेष

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणेश जयंती उत्सव न्यासाच्या परिसरात असलेल्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.*

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

दरम्यान न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व विश्वस्त सौ.अर्पिताराजे भोसले यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाली. त्या नंतर श्रींचा पाळणा उत्सव शेकडो महिलांच्या उपस्थितीत पार पडला. सकाळ पासून श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. पाळणा कार्यक्रमा नंतर आरती, महाप्रसाद उपस्थित भक्तांना देण्यात आले. विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या मंत्र पठणाने संपन्न झाली.

HTML img Tag Simply Easy Learning    

न्यासाच्या परिसरात शमीवृक्षाखाली गेल्या ३६ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर व सभामंडप बांधण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या पावन भूमीवर श्री शमी विघ्नेश गणेश असल्याने त्याचे स्थान व महात्म्य अलौकिक आहे. श्री गणेश जयंती मोठ्या श्रद्धेनं आणि उत्साहात साजरा करण्यात आली.

HTML img Tag Simply Easy Learning    

या कार्यक्रमास न्यासाचे हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई भोसले, विश्वस्त अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, माजी नगर सेविका सोनाली शिंदे, डॉ.पवित्र मलगोंडा, रुपाली शहा, डॉ.असावरी पेडगावकर, कोमल क्षीरसागर, अक्षता खोबरे, सविता खोबरे, सौ.अंबुरे, स्मिता कदम, स्वाती निकम, श्रुती मोरे, रूपा पवार, अंजना पवार, सुवर्णा घाडगे, कविता वाकडे, संगीता भोसले, उज्वला भोसले, स्वपना काळे, संपदा श्रीमान, सौ. भिम्पुरे, प्रतिभा पाटील, तृप्ती बाबर, राजश्री माने हे उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

याप्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, वसंतराव कुलकर्णी, सुरेशराव जाधव, मनोज निकम, पिंटू दोडमनी, सौरभ मोरे, वैभव मोरे, आप्पा हंचाटे, विशाल कलबुरगी, बाळासाहेब घाडगे, राजू पवार, नामा भोसले, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, गणेश पाटील, निखील पाटील, अतिष पवार, पिंटू साठे, स्वामींनाथ बाबर, सुराज्य घाडगे, महादेव अनगले, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, किरण साठे, गोरख माळी, मुन्ना कोल्हे, राहुल इंडे, ओंकार देशमुख, दरेप्पा जाकापुरे, राजेंद्र इब्राहिमपूरे, सोमनाथ शिंदे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button