गावगाथा

चंद्रयान – ०३ मोहीम यशस्वी लँडिंगसाठी वटवृक्ष मंदिरात प्रथमेश इंगळेंचे स्वामी चरणी साकडे

चंद्रयान - ०३ मोहीम यशस्वी लँडिंगसाठी वटवृक्ष मंदिरात प्रथमेश इंगळेंचे स्वामी चरणी साकडे

चंद्रयान – ०३ मोहीम यशस्वी लँडिंगसाठी वटवृक्ष मंदिरात प्रथमेश इंगळेंचे स्वामी चरणी साकडे

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२३/८/२३)
(श्रीशैल गवंडी) – आता थोड्याच वेळात सायं ५:४५ पासून १८ मिनिटांचा थरार आपल्याला अनुभवायचा आहे. त्या १८ मिनीटातले अत्यंत कठीण टप्पे जे तुम्ही लाईव्ह बघाल ते पुढील प्रमाणे असतील अशी माहिती येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांनी दिली.
गेल्या ४० दिवसांपासून सुरू असलेली ही मोहीम यशस्वी लँडिंग करिता सज्ज आहे. अवघ्या काही मिनिटांनी ही प्रक्रिया चालू होईल. अत्यंत क्लिष्ट गोष्टी पाहता सोप्या भाषेत जे होणार आहे ते समजून घेऊ.
रफ ब्रेकिंग फेज या पहिल्या स्टेप मधून चंद्रयान ०३ लँडिंगची सुरुवात होईल.
२५x१३४ कि.मी. कक्षेत फिरणारे चांद्रयान जेव्हा ३० किमी उंचीवर असेल तेव्हापासून त्याचा प्रचंड हॉरीझंटल वेग १.६८ किमी सेकंद वरून आलमोस्ट ०.२ किमी सेकंद इतका कमी करण्यात येईल. चांद्रयानावरील १२ पैकी ४ इंजिन ८०० न्यूटनचा थर्स्ट यासाठी वापरतील. ह्या मध्ये यान ३० किमी उंची वरून ७.४२ किमी उंचीवर येईल. आणि त्याच वेळी लँडिंग साईट कडे ७१३.५ किमी सरकेल. साधारण ६९० सेकंदाची ही फेज असेल. अटीट्युड होल्डिंग फेज या दुसऱ्या स्टेप मधून अटीट्युडड नॉट अटीट्युड यान ७.४२ किमी उंचीवर येईल तेव्हा ही १० सेकंदाची फेज असेल. यात पहिल्यांदा हॉरीझेंटल लैंडर हा व्हर्टीकल अवस्थेत मध्ये आणण्यात येईल. यात यान ३.४८ किमी सरकेल. त्याची उंची चंद्राच्या पृष्ठभागापासून ७.४२ वरून ६.८ किमी करण्यात येईल.
यात हॉरीझेंटल वेग ३३६ मिटर सेकंदआणि खाली येण्याचा वेग हा ५९ मीटर सेकंद करण्यात येईल. फाईन ब्रेकिंग फेज ही प्रक्रीया १७५ सेकंदाची ही प्रक्रिया असेल. यात यान २८.५२ किमी लँडिंग साईट कडे सरकेल. याच फेज मध्ये यान पूर्ण व्हर्टीकल करण्यात येईल. यानाची उंची ६.८ किमी वरून ८०० ते १००० मीटर इतकी कमी करण्यात येईल. यावेळी सगळे सेन्सर चेक केले जातील. १५० मीटर उंचीवर हॅजर्ड एनालायसीस करण्यात येईल म्हणजेच उतरण्या योग्य जमीन आहे का खड्डे आहेत हे तपासण्यात येईल. यासाठी लँडर हॅझर्ड डिटेक्शन आणि अवॉयडन्स कॅमेरा (LHDAC) वापरण्यात येईल. योग्य नसेल तर यान १५० मीटर आजूबाजूला जागा शोधू शकेल. टर्मिनल डीसेंट फेज या पुढील स्टेपमध्ये हीच ती फेज ज्या मध्ये आपले स्वप्न पूर्ण होईल. लैंडर चंद्रभूमीला स्पर्श करेल. २ मीटर सेकंद या वेगाने यान चंद्रावर उतरेल. या फेज मध्ये चांद्रयान – २ जाऊ शकले नव्हते, पण आज सायं ६.४ मिनिटे, हीच ती वेळ असेल. या नंतर प्रग्यान रोव्हर बाहेर येईल. लॅडर आणि रोव्हर एकमेकांचे फोटो काढतील. आणि देशात जल्लोष असेल. ५ मोटर्स न वापरता ४ मोटर या वेळी बसवण्यात आल्या आहेत. एका मोटरच्या वजना इतके जास्त इंधन यावेळी यानाला देण्यात आले आहे. ह्या वेळी यान हे फेलर बेस्ड बनवले गेले आहे म्हणजेच सगळे सेन्सर फेल झाले अल्गोरिदम चुकली तरी यान चंद्रावर उतरेलच याची दक्षता घेण्यात आली आहे. यश या वेळी आपलेच आहे. अशी माहिती देऊन यश हे आपल्या वैज्ञानिकांच्या प्रयत्नांचे मोठे फळ असणार आहे. तरी हे अंतराळातील कार्य निर्विघ्नपणे पार पडावे. शास्त्रज्ञांच्या अनेक वर्षांचे स्वप्न पूर्णत्वास जावे कोणतेही विघ्न न येता चंद्रयान मोहीम -०३ यशस्वीरित्या लँडिंग व्हावे याकरिता आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दर्शन घेऊन स्वामी समर्थांच्या चरणी साकडे घातले असल्याचे मनोगत प्रथमेश इंगळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, स्वामीनाथ लोणारी, दीपक गवळी, श्रीकांत मलवे, विपुल जाधव इत्यादी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button