तरुण पिढीने उद्योगजकता क्षेत्रामध्ये पुढाकार घ्यावे- प्राचार्य डाॅ. एस. सी. अडवितोट.
स्वावलंबी भारत अभियान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व सी. बी.खेडगी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता विकास यात्रा

तरुण पिढीने उद्योगजकता क्षेत्रामध्ये पुढाकार घ्यावे- प्राचार्य डाॅ. एस. सी. अडवितोट.

अक्कलकोट, दि. २३- स्वावलंबी भारत अभियान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व सी. बी.खेडगी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता विकास यात्रेचे महाविद्यालयात प्रांगणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ‘स्वावलंबी भारत अभियान यात्रा’ रॅलीचे भव्य-दिव्य स्वागत प्राचार्य डॉ. शिवराय अडवितोट व वरिष्ठ प्राध्यापकगण तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या व तसेच रॅलीचे जिल्हा समन्वयक दीपक तरंगें व सहकार्यांच्या उपस्थित हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

तदनंतर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवराय अडवितोट म्हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणाबोबर आपल्या मनात असलेल्या कौशल्याचा वापर करून उद्योगकजता या क्षेत्राकडे वळावे.
प्रमुख वक्ते प्रशांत केसकर म्हणाले की, तरुणांनी उद्योजक बनण्यासाठी कोणकोणत्या बाबींची आवश्यकता आहे.याची माहिती सविस्तरपणे दिली. उद्योजकता या क्षेत्रामध्ये तरुण पिढीने पुढाकार घेऊन उद्योजक निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले.

सोलापूर विद्यापीठ सीनेट सदस्य
चन्नवीर बंकूर यांनीही विद्यार्थ्यांना उद्योजकता या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर इन्क्युबेशन सेंटरचे मॅनेजर श्रीनिवासन पाटील यांनीही विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता निर्माण करण्याचे आयोजनांबद्दल माहिती दिली.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक तरंगे ‘स्वावलंबी भारत अभियान’ जिल्हा समन्वयक यांनी केले. डॉ. बी. एन. कोणदे यांनी सर्व मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत केले.व डी.डी. होटकर यांनी सत्कार वाचन केले.व प्रमुख पाहुण्यांची ओळख वाणिज्य विभाग प्रमुख
प्रा. आबाराव सुरवसे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ.जी.एस. स्वामी यांनी आभार मानले. तसेच हिंदी विभागातील प्रा.एस.जे.पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

तसेच कार्यक्रमासाठी रसायनशास्त्र विभाग प्रमुख दयानंद कोरे, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख जयश्री बिराजदार आय.क्यु.ए.सी. समन्वयक संध्या परांजपे,प्रा.आनंद गंदगे, प्रा.एस.एम.अर्जुन,प्रा.मच्छींद्र रूपनर इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
