अक्कलकोट निसर्ग सेवा फाउंडेशनच्या वतीने वागदरी रोड शरण मठासमोरील रस्त्याच्या दोन्ही कडेवरील वाहतुकीला अडथळा ठरणारी काटेरी झाडे झुडपे काढण्यात आली
अक्कलकोट निसर्ग सेवा फाउंडेशन
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230827-WA0070-780x470.jpg)
अक्कलकोट निसर्ग सेवा फाउंडेशनच्या वतीने वागदरी रोड शरण मठासमोरील रस्त्याच्या दोन्ही कडेवरील वाहतुकीला अडथळा ठरणारी काटेरी झाडे झुडपे काढण्यात आली.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
अक्कलकोट –वागदरी रोड शरण मठासमोरील रस्त्याच्या दोन्ही कडेवरील वाहतुकीला अडथळा ठरणारी काटेरी झाडे झुडपे काढण्यात आली बाभळीची काटेरी झाडे ही पूर्णपणे रस्त्यावर येऊन टेकलेली असल्याने दोन वाहने पास होणे जिक्रीचे झाले होते. शिवाय बाभळीची काटेरी झाडे झुडपे असल्याने वाहन चालकांना वाहने पंक्चर होण्याची भीती होती. तसेच पावसाळ्यात वाऱ्या वादळामुळे झाडपडी होत असल्याने वाहतुकीला अडचण येत होती.शिवाय यामुळे श्री क्षेत्र अक्कलकोट नगरीचे प्रवेश द्वार विद्रूप दिसत होते.
दिवसेंदिवस अक्कलकोट नगरीला श्री स्वामी भक्तांची वाढती गर्दी व त्यांना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी लक्षात घेऊन सदरील रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा येऊ पाहणारी काटेरी झाडे झुडपे निसर्ग सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून काढण्यात आली. यामुळे रस्ता जणू मोकळा श्वास घेऊ लागली होती. तसेच आजूबाजूला झाडांचे पालापाचोळा व माती पडली होती. काही ठिकाणी गटारीत मृत प्राणी- जनावरांचे मांस पडले होते सर्वत्र दुर्गंधी यामुळे नागरिकांना वाहनचालकांना व स्वामी भक्तांना येता जाता त्रास होत होता हीच बाब लक्षात घेवून सदर परिसर स्वच्छ करण्यात आले.या प्रसंगी सर्व स्वयंसेवक मोठ्ठ्या संख्येने आवर्जुन स्वयंप्रेरणेने उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
स्वयंसेवकांत लहान-मोठ्ठे असा कोणता ही भेदभाव न करता प्रत्येक जण खांद्याला खांदा लावून मन लावून स्वच्छतेचे कार्य तत्परतेने करत होते. सर्व स्वयंसेवकांनी स्वच्छ अक्कलकोटचा निर्धार करून स्वच्छ ता मोहिमेत सहभागी झाले होते.राहिलेले काटेरी झाडे झुडपे व स्वच्छता अभियान पुढील रविवारी करण्यात येणार आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)