गावगाथा

क्रांतिवीर शरण हरळय्या व क्रांती वीरांगणा कल्याणम्मा यांच्या बलिदानामुळेच वचन साहित्याचे रक्षण झाले.- डॉ भीमराव पाटील

जागतिक लिंगायत महासभेच्या सोलापूर शाखेच्यावतीने श्रावण मासानिमित्त

क्रांतिवीर शरण हरळय्या व क्रांती वीरांगणा कल्याणम्मा यांच्या बलिदानामुळेच वचन साहित्याचे रक्षण झाले.- डॉ भीमराव पाटील

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर – जागतिक लिंगायत महासभेच्या सोलापूर शाखेच्यावतीने श्रावण मासानिमित्त हत्तुरे वस्ती परिसरातील हरळय्या नगर येथे शरण हरळय्या व कल्याण क्रांती या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते डॉ.भीमराव पाटील (लातूर) यांनी विचार आक्रमक भाषेत विचार मांडले. प्रारंभी महात्मा बसवेश्वर,शरण हरळय्या व संत रोहिदास यांच्या प्रतिमेचे पूजा अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे समन्वयक विजयकुमार हत्तुरे यांनी केले.व प्रसिद्ध व्याख्याते डॉ.भीमराव पाटील, चर्मकार ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण कट्टीमनी यांनी द्वीप प्रचलन केले. याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मार्गदर्शक शावरप्पा वाघमारे, ज्येष्ठ साहित्यिक चेन्नवीर भद्रेश्वर मठ, शंकरलिंग महिला मंडळाचे अध्यक्ष राजश्री थळंगे,डॉ.भीमाशंकर सिंदगी, प्राचार्य दत्ता हरवाळकर,नागेंद्र कोगनुरे,मल्लिकार्जुन मुलगे आदी मान्यवर उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

बाराव्या शतकात महात्मा बसवण्णांनी ७७० शरण- शरणीना सोबत घेवून अनुभव मंडपची स्थापना केली. वंचित,उपेक्षित बहुजन वर्गातील सर्व स्त्री-पुरुषांना त्यांनी संघटित केले. त्यांना शिक्षणाचा,भाषणाचा, त्यांना मान सन्मानाने जगण्याच हक्क मिळवून दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय तत्त्वावर आधारलेला त्यांचा अनुभव मंटप राजेशाही राज्यात लोकशाहीची प्रयोगशाळा होती. असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर भीमराव पाटील यांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

डॉ. पाटील म्हणाले महात्मा बसवानांच्या शरण समता चळवळीत- देशविदेशातील शरण-शरणी सहभागी झाले. ते शरण बनले वचनकार झाले. त्यांनी कन्नड लोकभाषेत भाषेत वचनांची रचना करून वचनसाहित्याचे नवयुग निर्माण केले. त्यांच्या शरण आंदोलनात शिरपूर हुन जि.गुलबर्गा येथील शरण हरळय्या व शरणी कल्याणमा सहभागी झाले. अनुभव मंटपचे सदस्य बनले त्यांनी वर्णव्यवस्थेचा त्याग करून शरण हरळय्या व शरण मधुवय्या हे व्याही झाले. शीलवंत व लावण्य यांचा ऐतिहासिक विवाह कल्याणमध्ये संपन्न झाली. विषमतावादयांनी त्या विवाहास विरोध केली ते राजा बिजलाने शरण हरळय्या, मधुवय्या व शिलवंतास ‘ ऐळे हुट्टे ‘ शिक्षा म्हणजेच हत्तीच्या पायाखाली देहांताची शिक्षा दिली. सामाजिक समतेसाठी त्यांनी स्वतःचे बलिदान देऊन लढाईत शहीद झाल्या.

पुढे शरण हरळय्या यांची पत्नी कल्याणम्मा क्रांतिवीरंगणा
बनून हाती तलवार घेऊन वचनसाहित्याच्या रक्षणासाठी तिगडी, जि.बेळगाव कर्नाटक येथील लढाईच्या शहीद झाल्या. आज तिगडी त्यांची शहीद समाधी आहे अशा प्रकारे सामाजिक समतेसाठी व वचन साहित्याच्या रक्षणासाठी शरण हरळय्याच्या परिवाराने दिलेले बलिदान आजही सर्वांना प्रेरणादायी आहे.क्रांतीविरांग ना कल्याणमा,शरण हरळय्या व शरण मधुवय्या,शीलवंत यांचा वारसदार असलेल्या हरळय्या- समाजाने कल्याण क्रांतीचा इतिहास समजून घेण्याची वेळ आता आलेली आहे. तो इतिहास वाचून समजून घेऊन नवा इतिहास घडवावा असे आवाहन या प्रसंगी वचन साहित्याचे गाढे अभ्यासक व प्रसिद्ध व्याख्याते डॉ.भीमराव पाटील यांनी केले आहे. यावेळी धोंडाप्पा तोरनगी, प्रा. शिवलिंग अचलेरे,मयूर स्वामी, जीवन चाबुकस्वार,लक्ष्मण किणीकर,शिवराज कोटगी,राम कांबळे,बसवराज चाकाई,राजेंद्र हौदे,अशोक शेगावकर, राहुल निलाखे, विश्वजीत हेले, विजय भावे, शिवानंद बाहेरमठ, राजशेखर लोकापुरे, बसवराज लोकापुरे,नागेश पडनुरे,गणेश धोकटे, प्रभूलिंग कोरेसह जागतिक लिंगायत महासभेचे शहर व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button