गांधी बाल मंदिर शाळा कुर्ला येथे हेल्मेट वाटप कार्यक्रम संपन्न
मान्यवरांच्या हस्ते पालक, एनसीसी कॅडेट व विद्यार्थी यांना एकूण १५० हेल्मेट वितरीत करण्यात आली.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230901-WA0038-780x470.jpg)
गांधी बाल मंदिर शाळा कुर्ला येथे हेल्मेट वाटप कार्यक्रम संपन्न
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
गांधी बाल मंदिर हायस्कूल कुर्ला या शाळेत सेवा सहयोग फाउंडेशन व आय सी आय सी आय लोंबार्ड यांच्या वतीने. हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सेवा सहयोग फाउंडेशनचे राहुल पांडे व रुपेश, कुर्ला विनोबा भावे पोलीस स्टेशनचे शरद कोळेकर, दिपेश शिंदे, दीपक शिंदे हे अधिकारी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक अनिल पांचाळ यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले सर्व मान्यवरांच्या हस्ते पालक, एनसीसी कॅडेट व विद्यार्थी यांना एकूण १५० हेल्मेट वितरीत करण्यातआली. सदर कार्यक्रमाला शाळेतील अमोल जागले, घनश्याम जोशी, अर्चना वीरकर आदी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अर्चना जाधव यांनी केले. ह्या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे शिक्षक व एन सी सी प्रमुख ऑफिसर विश्वनाथ पांचाळ सर यांनी केले होते. प्रवासात हेल्मेट खूप महत्वाचे असून त्याचा नियमित वापर करणार असल्याचा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त करण्यात आला.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)