ग्रामीण घडामोडी

सकल मराठा समाज संघटन अक्कलकोट शहर तालुक्याच्या वतीने अंतरावली सराटी येथील लाठी हल्ल्याचा निषेध..

सकल मराठा समाज संघटन अक्कलकोट शहर तालुक्याच्या वतीने अंतरावली सराटी येथील लाठी हल्ल्याचा निषेध,..

सकल मराठा समाज संघटन अक्कलकोट शहर तालुक्याच्या वतीने अंतरावली सराटी येथील लाठी हल्ल्याचा निषेध,..

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट दि.०२ प्रतिनिधी सकल मराठा समाज, मराठा संघटन अक्कलकोट शहर तालुक्याच्या वतीने अंतरावली सराटी तालुका अंबड, जिल्हा जालना या ठिकाणी पोलिसांनी आंदोलन कार्त्यावर केलेल्या अमानुष लाठी हल्ला व गोळीबार करून जगाला आंदोलनाची दिशा देणाऱ्या मराठा समाजावर हल्ला केल्याबद्दल अक्कलकोट ते सोलापूर रस्त्यावर रास्ता रोको करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी तहसीलदार बाळासाहेब सिरसाट यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी हे उपस्थित होते.
दरम्यान रास्ता रोको मुळे दुतर्फा वाहनाची रांग लागलेली होती या चक्का जाम आंदोलनात मराठा समाज शेकडोच्या संख्येने उपस्थित होता.अंतरावली येथील घटनेत मनोज जरांगे पाटील रीतसर मार्गाने बेमुदत आमरण उपोषण सुरु असताना सदरचे उपोषण उधळून लावण्यासाठी पोलिसांचा प्रचंड मोठा फौज फाटा घेऊन सदरचे आंदोलन चिरडून काढण्यासाठी समाजातील महिला, लहान मुले, वृद्ध व तरुणांवर लाठी हल्ला व गोळीबार करून जगाला आंदोलनाची दिशा देणाऱ्या मराठा समाजावर हल्ला करण्यात आला. याबद्दल अक्कलकोट ते सोलापूर रस्त्यावर रास्ता रोको करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आले. या पुढील काळात जिल्हा सकल मराठा समाजाकडून जी आंदोलनाची दिशा ठरविली जाईल त्या पद्दतीने सकल मराठा समाज, मराठा संघटन अक्कलकोट शहर तालुक्याच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे आंदोलन कर्त्यांनी सांगितले.

HTML img Tag Simply Easy Learning    


या प्रसंगी विविध जणांनी मनोगतातून भ्याड हल्ल्याचा तिखट शब्दात निषेध व्यक्त केले. या वेळी आंदोलन कर्त्यांची माजी राज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, अशपाकभाई बळ्ळोरगी, मल्लिकार्जुन पाटील यांनी भेट घेतली.
या आंदोलनाच्या वेळी समाजाचे जेष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी, अमोलराजे भोसले, महेश इंगळे, बाबासाहेब निंबाळकर, मनोज निकम, गोटू माने, बाळासाहेब मोरे, तम्मा शेळके, राजाभाऊ नवले, शितल जाधव, रवी कदम, प्रवीण घाडगे, वैभव मोरे, अतिश पवार, योगेश पवार, बालाजी पाटील, मारुतीराव बावडे, मनोज इंगुले, निखिल पाटील, देवानंद काजळे, ज्ञानेश्वर भोसले, काशिनाथ कदम, आकाश शिंदे, गणेश पाटील, महेश दणके, गोविंदराव शिंदे, प्रथमेश पवार, मनोज गंगणे, मंगेश फुटाणे, सुरेश कदम, स्वामीराव मोरे, प्रशांत भगरे, स्वामिनाथ बाबर, नागराज पाटील, आकाश सुर्यवंशी, रवी पोळ, विनायक भोसले, ओंकार देशमुख, शरद भोसले, लक्ष्मण शिंदे, राजाराम पवार, अमर शिंदे, प्रसाद मोरे, अजय शिंदे, रावसाहेब मोरे, सिद्धाराम माळी, फहीम पिरजादे, अभिषेक चव्हाण, दत्ता मोरे, दत्ता माने, विशाल घाडगे, धनंजय निंबाळकर, शुभम कामनुरकर, शुभम सावंत, शुभम चव्हाण, विकी गडदे, ओंकार दुरुगकर, विशाल कलबुर्गी, राज जोजन, अक्षय पवार, राहूल शिंदे, निखिल शिंदे, श्रीशैल कुंभार, महेश निंबोळे, शरद पवार, अमित कोळी, अंकुश मोरे, गीत पवार, अनंत पवार, अंबादास शिंदे, सुमित कल्याणी, विष्णू गुमटे यांच्या सह शेकडो च्या संख्येने मराठा समाजातील युवक उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button