श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सुरु असलेले कार्य भावना व्यक्त करण्यासाठी मला माझे शब्द अपुरे पडतात, या ठिकाणी खरोखरच आपली भारतीय संस्कृती व तत्वज्ञान यांचे प्रतिबिंब अनुभवलि ; डॉ.प्रो. विश्वनाथ कराड
युनिस्को, एम.आय.टी. पुणे, जागतिक शांतता केंद्र आळंदी यांच्या वतीने डॉ.प्रो. विश्वनाथ कराड यांनी प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांचा सत्कार सरस्वती व माऊलींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सुरु असलेले कार्य भावना व्यक्त करण्यासाठी मला माझे शब्द अपुरे पडतात, या ठिकाणी खरोखरच आपली भारतीय संस्कृती व तत्वज्ञान यांचे प्रतिबिंब अनुभवलि ; डॉ.प्रो. विश्वनाथ कराड

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून सुरु असलेले कार्य भावना व्यक्त करण्यासाठी मला माझे शब्द अपुरे पडतात, या ठिकाणी खरोखरच आपली भारतीय संस्कृती व तत्वज्ञान यांचे प्रतिबिंब अनुभवला आले असल्याचे मनोगत युनिस्को, एम.आय.टी. पुणे, जागतिक शांतता केंद्र आळंदी चे संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रो. विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सह परिवार आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या कडून श्रींची मुर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी त्यांच्या सामवेत एम.आय.टी.चे विश्वस्त सौ. उषा विश्वनाथ कराड, काशीराम कराड, तुळशीराम कराड, सह कार्यकारी विश्वस्त डॉ. सुचित्रा नांगरे हे उपस्थित होते, यांचा देखील सत्कार करण्यात आला.

डॉ.प्रो. विश्वनाथ कराड पुढे बोलताना म्हाणाले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी स्वामी भक्त आणि गरजवंत यांच्यासाठी जी अन्नदान सेवा चालू केलेली आहे हिच खरी मानवतेची पूजा आहे हे नम्रपणे सांगत असल्याचे यावेळी डॉ.प्रो. विश्वनाथ कराड म्हाणाले.

यावेळी युनिस्को, एम.आय.टी. पुणे, जागतिक शांतता केंद्र आळंदी यांच्या वतीने डॉ.प्रो. विश्वनाथ कराड यांनी प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांचा सत्कार सरस्वती व माऊलींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, पुरोहित संजय कुलकर्णी, ओंकारेश्वर उटगे, बालाजी कटारे, रोहित उण्णद, सिद्धेश्वर हत्तुरे, निखिल पाटील, गोटू माने, बाळासाहेब पोळ, एस.के. स्वामी, शावरेप्पा माणकोजी, सिद्धाराम कल्याणी, महादेव अनगले, धनप्पा उमदी, मल्लिकार्जुन बिराजदार, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, श्रीनिवास गवंडी, प्रसन्ना बिराजदार, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, रमेश हेगडे, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, समर्थ घाडगे, देवराज हंजगे, अनिल बिराजदार, मल्लिनाथ कोगनुरे, लाला निंबाळकर, कल्याण देशमुख, गोविंदराव शिंदे, भरत राजेगावकर, शुभम भिंगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.