श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे महाप्रसाद सेवा ही स्वामींची साक्ष असल्याचे मनोगत श्री स्वामी समर्थांची भूमिका करणारे श्री स्वामी समर्थ मालिकेतील अक्षय मुदवाडकर
महाप्रसाद

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे महाप्रसाद सेवा ही स्वामींची साक्ष असल्याचे मनोगत श्री स्वामी समर्थांची भूमिका करणारे श्री स्वामी समर्थ मालिकेतील अक्षय मुदवाडकर
अक्कलकोट, दि.18 : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाप्रसाद सेवा ही स्वामींची साक्ष असल्याचे मनोगत श्री स्वामी समर्थांची भूमिका करणारे श्री स्वामी समर्थ मालिकेतील अक्षय मुदवाडकर यांनी व्यक्त केले.
ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता मंडळाचे प्रमख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत सुमूख ची भूमिका करणारे अनुप ठाकरे, दिग्दर्शक सोहम देवधर यांचा देखील सत्कार न्यासाच्यावतीने करण्यात आला.
यावेळी मंडळाचे सचिव शामराव मोरे, माजी नगरसेवक रामचंद्र समाणे, सनी सोनटक्के, पुरोहित संजय कुलकर्णी, एस.के.स्वामी, निखिल पाटील, प्रविण घाटगे, विराज माणिकशेट्टी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.