भाविकांच्या सेवेसाठी श्री.वटवृक्ष मंदीर समिती न्यासाची वाटचाल लक्षणीय – पोलीस अधिक्षक अतुलचंद्र कुलकर्णी
श्री गुरुपौर्णिमेनिमीत्त श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेवून अक्कलकोट येथील चोख पोलीस बंदोबस्ताची पाहणी दरम्यान पोलीस अधिक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांचे मनोगत.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.११/०७/२०२५)
येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरीता येणाऱ्या भाविकांसाठी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने देवस्थानच्या मुरलीधर मंदिराच्या ठिकाणी सुसज्ज वातानुकूलित भक्तनिवासाचे बांधकाम तसेच स्वामी भक्तांच्या सुलभ स्वामी दर्शनाकरिता दर्शन रांगेचे बांधकाम हाती घेण्यात आले आहेत. या सर्व बाबी स्वामी भक्तांसाठी सेवाभाव या हेतूने मंदिर समिती नेहमीच प्रयत्नशील राहून विविध उपक्रम राबवत असते. त्या अनुषंगाने नियोजीत मुरलीधर मंदिर येथील दर्शन रांगेच्या माध्यमातून सर्व स्वामीभक्तांना लवकरच स्वामी समर्थांचे सुलभ रीत्या दर्शन घेता येईल. यासह देवस्थानचे आध्यात्मिक धार्मिक सामाजिक कार्यातील योगदान लक्षात घेता नागरिकांच्या व भाविकांच्या सेवेसाठी श्री वटवृक्ष मंदिर समिती न्यासाची वाटचाल लक्षणीय असल्याचे मनोगत सोलापूरचे पोलीस अधिक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते नुकतेच गुरुपौर्णिमेनिमीत्त येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री.स्वामी समर्थांची आरती करून दर्शन घेतले. या प्रसंगी त्यांनी अक्कलकोट येथे गुरुपौर्णिमेनिमीत्त पुरविण्यात आलेल्या चोख पोलीस बंदोबस्ताचीही पाहणी केली व समाधान व्यक्त केले. या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी पोलीस अधिक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी पोलीस अधिक्षक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी वरिष्ठ पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, डीवायएसपी विलास यामावार, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे,
मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, प्रथमेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, मनोज इंगुले, आदीत्य गवंडी, सावंत दर्शन घाटगे, धनराज स्वामी, अमर पाटील इत्यादी व स्वामी भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – अतुलचंद्र कुलकर्णी यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!