*आमदार कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त तीर्थक्षेत्री दर्शन; सरपंच आशा बिराजदार यांचा अभिनव उपक्रम*
वाढदिवस विशेष

*आमदार कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त तीर्थक्षेत्री दर्शन; सरपंच आशा बिराजदार यांचा अभिनव उपक्रम*

*अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त शिरवळ येथील १०१ महिलांना महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी सह अणदूर व परिसरातील देवदर्शन घङवून आणले.*

दर वेळेस नवनवीन उपक्रम देणार्या शिरवळच्या सरपंच आशा शरणबसप्पा बिराजदार यांनी यावेळी महिलांसाठी देवदर्शनाबरोबर एकदिवसीय सहलीचे आयोजन केले होते.

महिलांना थोडा विरंगुळा मिळावा म्हणून त्यांना रम्य निसर्ग सानिध्यात आनंद मिळावा या हेतूने सहलीचे आयोजन केले होते. तुळजापूरसह अणदूर येथे देवदर्शनासह मनमुराद आनंद महिलांनी घेतला.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिलांना मोफत तीर्थयात्रा घङविण्याचा उपक्रम स्तुत्य आणि अनुकरणीय आहे.

आशा बिराजदार यांनी समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची जाणीव ठेवून अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी हाती घेतले असून, हि बाब कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. यावेळी महिलांनी आशा बिराजदार यांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले.