गावगाथा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूम येथे वाचन प्रेरणा दिन साजरा..

दिन विशेष

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूम येथे वाचन प्रेरणा दिन साजरा..

मुरुम – १५ ऑक्टोबर २०२४ येथे १५ ऑक्टोबर रोजी स्पेशल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूम येथे वाचन प्रेरणा दिन
हा ” प्रेरणा दिन” ग्रंथ प्रदर्शन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड आणि ज्ञानाची उपासना वाढवणे आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक सौ. तुपुरे मॅडम. हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय मुरूमचे सहसचिव महेंद्र कुमार कांबळे,हे होते.या दोघाच्या हस्ते सर्वप्रथम डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सह शिक्षक श्री.रुपचंद ख्याडे.व सौ रेणुका कुलकर्णी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय मुरूम यांच्यी पुस्तकां संबंधी प्रेम व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वाचन या विषयी विद्यार्थ्यांना त्यांचे जीवनपट आपल्या भाषणातून व्यक्त केला.
तदनंतर वाचनाचे महत्त्व आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी सखोल माहितीखालील प्रमाणे दिली.
डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे एका गरीब कुटुंबात झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची कास धरली आणि वैज्ञानिक होण्याचे स्वप्न पूर्ण केले. ते भारताच्या अंतराळ संशोधन व विकास क्षेत्रातले महत्त्वाचे शिल्पकार मानले जातात. भारतीय अंतराळ कार्यक्रमातील ‘मिसाइल मॅन’ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी अग्नी, पृथ्वी यासारख्या क्षेपणास्त्रांच्या विकासात मोलाचा वाटा उचलला. २००२ ते २००७ दरम्यान ते भारताचे राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते. त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे आणि विद्यार्थ्यांशी असलेल्या विशेष नात्यामुळे त्यांना ‘जनतेचे राष्ट्रपती’ म्हणून ओळखले.

यावेळी सहशिक्षक अभिजित कांबळे, सौ कचले मॅडम, रेड्डी मॅडम,शिवाजी गायकवाड,आदीसह हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय मुरूमचे ग्रंथपाल राजेश गायकवाड, प्रतिक कांबळे,सुरेश कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button