*वाचनाने माणूस सुसंस्कृत बनतो : पोलीस निरीक्षक मा.श्री.महेश स्वामी*
मातोश्री एन्.सी.खेडगी प्रशाला अक्कलकोट येथे गणेशोत्सव व्याख्यानमाला*
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230925-WA0064-780x470.jpg)
*वाचनाने माणूस सुसंस्कृत बनतो : पोलीस निरीक्षक मा.श्री.महेश स्वामी*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अक्कलकोट प्रतिनिधी – *मातोश्री एन्.सी.खेडगी प्रशाला अक्कलकोट येथे गणेशोत्सव व्याख्यानमाला अंतर्गत दक्षिण पोलिस ठाणे अक्कलकोटचे पोलीस निरीक्षक माझे मार्गदर्शक मा.श्री.महेश स्वामी साहेब यांनी “स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांची भुमिका” याविषयावर पुष्प गुंफले.यावेळी प्रास्ताविक मुख्याध्यापक साखरे सर यांनी केले.अतिथी परिचय पर्यवेक्षक रमेश स्वामी सर यांनी केले.आपल्या जीवनात वाचनाचे महत्व अन्यन्यसाधारण असून प्रत्येकांनी वाचनाचा छंद जोपासले पाहिजे.जीवनात आई वडिलांची सेवा करा.स्पर्धेत टिकण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही.दररोज नियमित वाचन मनन व चिंतन केल्यास यश मिळते.आधुनिक युगात मोबाईलमुळे अनेक गुन्हे घडत आहेत.मोबाईलचा वापर ज्ञानग्रहण करण्यासाठी व चांगल्या कामासाठी करावा.जीवनात सामाजिक भान ठेवून वागले पाहिजे.अशा अनेक विचार उदाहरणासह विद्यार्थ्यांना पटवून देत कायदा ,सुव्यवस्था, व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगावे. तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा मोलाचा संदेश स्वामी साहेब यांनी आपल्या व्याख्यानातून दिले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालिका सौ.पवित्राताई खेडगी होत्या. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भुसणगी मॕडम यांनी तर आभार गावसाने मॕडम यांनी मानले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)