शैक्षणिक घडामोडी

प्राथमिक स्तरापासूनच विद्यार्थ्यांना अत्याधुनिक ज्ञानाची गरज : बापूराव चव्हाण

वागदरी कन्नड शाळेत डिजिटल कक्षाचे उद्घाटन

वागदरी कन्नड शाळेत डिजिटल कक्षाचे उद्घाटन
प्राथमिक स्तरापासूनच विद्यार्थ्यांना अत्याधुनिक ज्ञानाची गरज : बापूराव चव्हाण


अक्कलकोट
आजचे युग हे संगणक आणि तंत्रज्ञानाचे युग असल्याने प्राथमिक स्तरा पासूनच मुलांना हे ज्ञान देणे गरजेचे आहे. शाळेत डिजिटल खोली निर्माण केल्याबद्धल भुरीकवठे केंद्राचे केंद्र प्रमुख बापूराव चव्हाण यांनी वागदरी कन्नड शाळेच्या शिक्षकांचे कौतुक केले.
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी प्राथमिक कन्नड शाळेत नुकत्याच निर्माण करण्य्यात आलेल्या डिजिटल कक्षाचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्षपद भूषवून ते म्हणाले की, संपूर्ण जिल्ह्यात कुठेही प्राथमिक स्तरावर अशी खोली नाही. मुख्याध्यापक, शिक्षक व पालक, शाळा शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन मुलांना अत्याधुनिक ज्ञान देऊन त्याचा मुलांच्या शिक्षणात चांगला वापर करण्याचे आवाहन केले आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून तालुका शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा चंद्रकांत बटागेरी म्हणाल्या की, मुख्याध्यापक व शिक्षकांनी मिळून शाळेतील विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्यासाठी स्वतंत्रपणे कक्ष तयार केला आहे त्याचे पुरेपुरा वापर करण्याचे सांगितले
तंत्रस्नेही शिक्षक शिवानंद गोगव म्हणाले की, सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामीजी यांनी दोन संगणक व प्रिंटर , वागदरी येथील एसएसबाई बँकेकडून एक संगणक ,शाळेतील एक संगणक, झेडपी कडून मिळालेले स्मार्ट टीव्ही, पंचायत समिती सदस्य गुंडप्पा पोमाजी यांनी आपल्या शाळेला एक संगणक व एक प्रोजेक्टर दिला आहे. मुलांना वेळापत्रकानुसार शिकवले जात आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी सकाळी ९ ते १०.२० या वेळेत ते मुलांना संगणकाचे क्लास घेण्यात येते. आणि आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचा ज्ञानकोश वाढविण्यासाठी अध्यापनातही त्यांचा वापर केला जातो. मुले चांगला प्रतिसाद देत आहे. दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहे ते म्हणाले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होनप्पा कंबरा यांनी फीत कापून डिजिटल कक्षाचे उद्घाटन केले व शाळेला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांनी डिजिटल खोली फुलांनी आणि रांगोळीने सजवली होती.
समितीचे उपाध्यक्ष राजकुमार पोमाजी, सदस्य सिद्धाराम भैरामडगी, तालुका शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष चंद्रकांता बटागेरी, परमेश्वर मुनोळी, जयश्री मुनोळी, सिद्धराम होदलुरे, विध्यर्थी , पालक आदी उपस्थित होते

फोटो ओळ – शाळा व्यावस्थापण समिती चे अध्यक्ष होन्नप्प कंबार यांनी वागदरी प्राथमिक कन्नड शाळेत तयार केलेले डिजिटल कक्ष्या चे फीत कापून उद्घाटन केले .उपाध्यक्ष राजकुमार पोमाजी , सदस्य सिद्धाराम भैरामडगी, मुख्याध्यापक बसवराज मुनोळी , तंत्र स्नेही शिक्षक शिवानंद गोगाव , अन्य शिक्षक उपस्थित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button