Akkalkot : न्यासाचे कार्य केरळ पर्यंत पोहचले, इथे धर्म आणि धार्मिकतेचा संगम पाहायला मिळते ; केरळचे श्री योगानंद सरस्वती स्वामीजी यांचे प्रतिपादन

अक्कलकोट (प्रतिनिधी): श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून सुरु असलेले धार्मिक क्षेत्रातील कार्य केरळ राज्यापर्यंत पोहचले असून, येथे धर्म आणि धार्मिकतेचा संगम पाहायला मिळत असल्याचे मनोगत श्री नित्यानंद योगाश्रम कोंडेवूर मठ, कासरगुड (केरळ राज्य) चे श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी यांनी व्यक्त केले.


ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.


यावेळी न्यासाचे एस.के.स्वामी, सिध्दाराम कल्याणी, बाळासाहेब घाडगे, सतीश महिंद्रकर, शहाजी यादव, नामा भोसले, निखील पाटील, प्रवीण घाडगे, विराज माणिकशेट्टी, आकाश कडबगांवकर, दत्ता माने, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.