गावगाथा

*लिंगायत समाजाच्या विविध मागण्या संदर्भात सुरेश वाले यांचे मौजे वटवटे ते सोलापूर पायी पदयात्रा*

*लिंगायत समाज आक्रमक*

*लिंगायत समाजाच्या विविध मागण्या संदर्भात सुरेश वाले यांचे मौजे वटवटे ते सोलापूर पायी पदयात्रा*

*लिंगायत समाज आक्रमक*

सोलापूर -लिंगायत महासंघाचे लिंगायत समाजाच्या विविध मागण्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्याकरिता व मागण्या मान्य करण्यासाठी सुरेश वाले यांनी मौजे वटवटे ते श्री सिद्धेश्वर मंदिर व कोतंम चौकातील बसवेश्वर सर्कल येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यापर्यंत 40 किलोमीटरचा विना अनवाणी पायी पदयात्रा काढली. त्यानंतर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या निवेदनात लिंगायत धर्मीयांच्या विविध मागण्या – 1) जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक मंगळवेढा येथे लवकरात लवकर
निर्णय घेऊन उभारणी करावे. २) लिंगायत समाजाला सरसकट आरक्षण मिळणेबाबत.
३) लिंगायत समाजातील मुला-मुलीसाठी वसतीगृह लवकरात लवकर निर्णय घेऊन वसतीगृह उभारण्यात यावे.
४) वडापूर गॅरेजसाठी निधी उपलब्ध लवकरात लवकर मंजूर व्हावे अशाप्रकारे वरील विविध मागण्या लिंगायत महासंघातर्फे देण्यात आला. प्रांताध्यक्ष सुदर्शन बिरादार,लिंगायत समाजाचे वरिष्ठ नेते विजयकुमार हत्तुरे,गणेश चिंचोली, सचिन शिवशक्ती आनंद मुस्तारे,बसवराज बगले, प्रवीण वाले, वैभव विभुते,राजकुमार सारणे, मल्लिनाथ कलशेट्टी, शरद गुमटे,मल्लिनाथ सोलापूरे, बनसिद्ध म्हमाणे,संतोष राजमाने कल्याणराव चौधरी,सचिन तुगावे आदी उपस्थित होते. या आंदोलनास मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ,सोलापूर ग्रामदैवत श्री सिद्ध मल्लिकार्जुन प्रतिष्ठान,सोलापूर, समस्त वीरशैव लिंगायत समाज सोलापूर, महात्मा बसवेश्वर सर्कल मित्र मंडळ सोलापूर, अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य जागतिक लिंगायत महासभा महाराष्ट्र राज्य, हिंदू साम्राज्य प्रतिष्ठान सोलापूर, महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समिती मंगळवेढा सोलापूर, शिवा संघटना, कांचन फाउंडेशन आदी संघटनानी पाठिंबा दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button